रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद व रोटरी डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त माध्यमातून औरंगाबाद व परिसरातील गरजू रुग्णांच्या वापरण्यासाठी ५ ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका रुग्णाला ५ दिवसांसाठी ही एक मशीन मोफत दिली जात आहे. आतापर्यंत ८० कोरोनाबधित रुग्णांच्या कामी या मशीन आल्या आहेत. सध्या २६ रुग्णांसाठी या मशीन पाहिजे असून, त्याची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे.
आणखी नवीन १० मशीन क्लबतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ज्या कोरोना रुग्णाला याची आवश्यकता आहे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या भागातील रोटरी सदस्याचे किंवा नगरसेवकाचे ओळखीबाबतचे पत्र आणावे. ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद संस्थेच्या नावे पत्र, रुग्णाचे व मशीन घेऊन जाणाऱ्यांच्या आधार कार्डाची झेरॉक्स कॉपी आणणे आवश्यक आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ औरंगाबादचे अध्यक्ष विजय जैस्वाल यांनी दिली.