शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या उत्पन्नानंतरही प्रवाशांना सुविधांची ‘वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:11 IST

कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत असल्याची ओरड होत आहे.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने गेल्या वर्षभरात तब्बल ४८६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. गतवर्षीपेक्षा ६.६० टक्क्यांनी यंदा उत्पन्न वाढले आहे. मात्र, कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही प्रवाशांना सोयी-सुविधांसाठी नुसती ‘वेटिंग’ करावी लागत असल्याची ओरड होत आहे.

भारतात पहिल्यांदा १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान रेल्वे धावली. हा क्षण लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी रेल्वे सप्ताह साजरा करते. नांदेड विभागात मंगळवारी हा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी यानिमित्ताने नांदेड विभागाच्या वर्षभरातील कामगिरीची माहिती दिली. वर्षभरात केवळ प्रवासी वाहतुकीतून ३६८.५० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हे ७.७७ टक्क्यांनी अधिक आहे. नांदेड विभागात तिकीट तपासणीतून ६.७१ कोटींचा महसूल मिळाला आहे. तब्बल ४२६ लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर १.६३ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

नॉन इंटर लॉक वर्किंग करून मुदखेड ते मुगट आणि मालटेकडी-नांदेड-लिंबगावदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता परभणी-मनमाड दुहेरीकरणाला किमान २०२२ उजाडणार आहे.रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी म्हणाले, कोट्यवधींचे उत्पन्न घेऊनही सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुकुंदवाडी, लासूर स्टेशनला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, उत्पन्न घेतल्यानंतर त्या बदल्यात प्रवाशांना सुविधा दिल्या पाहिजे. मुकुं दवाडी येथे प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे नाहीत, पिण्याचे पाणीही मिळत नाही. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे कामही रेंगाळले आहे.

मुंबईसाठी रेल्वे मिळेनाशहरातून मुंबईला जनशताब्दी, देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या रेल्वेमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नव्या रेल्वेची मागणी होत आहे. परंतु मुंबईतील रेल्वेगाड्यांच्या गर्दीमुळे मध्य रेल्वेकडून परवानगी मिळत नाही, असेच सांगितले जाते. 

पीटलाईन अडगळीतपीटलाईन नसल्याच्या कारणानेही औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू होण्यास अडचण असल्याचे सांगितले जाते. प्रवासी संघटनांकडून मागणी करूनही पीटलाईनचा प्रस्ताव अडगळीत पडला आहे. जुन्या रेल्वेस्टेशनच्या इमारतीच्या विकासाचीही नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे