शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

घरफोडींच्या घटना वाढल्याने बँकेत लॉकर्ससाठी वेटिंग; मौल्यवान वस्तू, कागदपत्रांच्या सुरक्षेस प्राधान्य 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 6, 2023 20:06 IST

आता अशी परिस्थिती आहे, की बँकेत लॉकर्स लगेच उपलब्ध होणे कठीण झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे सोने-चांदीचे भाव उच्चांकी जात आहेत, दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीने घरातील दागिने बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवले जात आहेत; पण तिथेही सर्व लॉकर्स फुल असल्याने ग्राहकांना आपले दागिने ठेवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 

कितीही सोने-चांदी महाग झाले तरी खरेदीचा मोह सुटत नाही. काही जण गुंतवणूक म्हणूनही याकडे पाहतात. मात्र, वाढत्या घरफोड्या, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे आता नागरिक दागिने बँकेत ठेवणे पसंत करीत आहेत. त्यासाठी बँक भाडे आकारते ते सुद्धा ग्राहक भरत आहेत. मात्र, आता अशी परिस्थिती आहे, की बँकेत लॉकर्स लगेच उपलब्ध होणे कठीण झाले आहे.

सोने ६१ हजारांवरसोन्यात गुंतवणूक करणे सर्वांना फायदेशीर वाटत आहे. यामुळे सोन्याचे भावही वाढत आहे. बुधवारी सोने ६१,९०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊन पोहोचले होते. गुरुपुष्यामृतच्या दिवशी ६१६०० रुपयांनी सोने विकले गेले होते.

चांदी ७६ हजारांवरआज चांदीचे भावही ७६००० रुपयांवर येऊन ठेपले. ही भाववाढ डोळे पांढरे करणारी ठरत आहे. लग्नसराई सुरू झाल्याने चांदीला मागणी वाढली आहे. चांदीचे ताट, चांदीचे तांबे, ग्लास आदींची विक्री वाढली आहे.

बँकांमध्ये लॉकर्ससाठी वेटिंग१) सेंट्रल बँक ऑफ इंडिया : मुख्य रस्त्यावरील बँकांच्या ज्या शाखा आहेत. तिथे लॉकर्स फुल झाले आहेत. प्रतीक्षा यादी लागली आहे.२) स्टेट बँक ऑफ इंडिया : लॉकर्समध्येच दागिने, मालमत्ता कागदपत्रे ठेवणे पसंत करत असल्याने लॉकर्सची संख्या अपुरी पडत आहे. येथेही प्रतीक्षा यादी आहे.३) देवगिरी बँक : पूर्वी या बँकेच्या मुख्य रस्त्यावरील शाखेत लॉकर्स फुल असून, अंतर्गत रस्त्यावरील शाखेतही लॉकर्स फुल आहेत. काही शाखेत प्रतीक्षा यादी आहे.

का वाढली लॉकर्सची मागणीघरात सोने, दागिने ठेवणे जोखमीचे झाले आहे. बंद घर असेल तर घरफोडी होतेच. यामुळे नागरिक, जास्त भाडे लागले तरी चालेल; पण बँकेच्या लॉकर्समध्ये दागिने ठेवणे पसंत करीत आहे. याशिवाय मालमत्तेचे कागदपत्रेही लॉकर्समध्ये ठेवली जात आहेत.

लॉकर्सचे वर्षाचे दर कितीलहानसाठी १२०० ते १३०० रुपयेमध्यमसाठी २५०० ते २६०० रुपयेमोठा आकार- ३००० ते ३१०० रुपये

डिपॉझिटही घेतले जातेखाजगी, सहकारी बँका २५ हजार ते १ लाख दरम्यान डिपॉझिट घेतले जाते.

वर्षातून एकदा ऑपरेट करणे आवश्यकआरबीआयच्या नवीन नियमाप्रमाणे आपले लॉकर्स वर्षातून एकदा ऑपरेट करणे आवश्यक आहे, तसेच पूर्वी रजिस्टरवर नोंद होत असे; पण आता सिस्टममध्ये लॉकर्सची नोंद केली जात आहे. एवढेच नव्हे, तर बँक व ग्राहकांमधील लॉकर्सचा करार केला जात असून, तो १०० रुपयांच्या बाँडपेपरवर केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादbankबँक