शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

वाघोबांची आज रवानगी

By admin | Updated: January 15, 2016 23:55 IST

औरंगाबाद : मनपाच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पिवळ्या वाघांची एक जोडी घेऊन जाण्यासाठी मध्यप्रदेशातील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयाचे पथक शुक्रवारी शहरात दाखल झाले.

औरंगाबाद : मनपाच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पिवळ्या वाघांची एक जोडी घेऊन जाण्यासाठी मध्यप्रदेशातील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयाचे पथक शुक्रवारी शहरात दाखल झाले. त्यामुळे आता नर नकुल आणि मादी दुर्गा यांची उद्या सकाळी पथकासोबत पिंजऱ्यातून रवानगी केली जाणार आहे. हे दोघेही दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थमध्येच जन्मलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील महिन्यात मध्यप्रदेशातील सताना येथे नवीन प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याच (मुकुंदपूर) प्राणिसंग्रहालयात नकुल आणि दुर्गाचे पुढील वास्तव्य राहणार आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात एकूण ९ पिवळे वाघ आहेत. ही जोडी गेल्यानंतर येथे ७ पिवळे वाघ राहतील. विशेष म्हणजे याआधी मार्च महिन्यातही सिद्धार्थमधून एक पिवळा आणि एक पांढरा वाघ पुणे येथे पाठविण्यात आलेला आहे. वाघांची संख्या जास्त असल्यामुळे सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीने काही दिवसांपूर्वीच येथून वाघांची एक जोडी मुकुंदपूरला देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वीच मनपाच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय प्रशासनाने मुकुंदपूर प्राणिसंग्रहालय प्रशासनाला हे वाघ घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तेथील प्राणिसंग्रहालय प्रशासनाचे एक पथक आज दोन पिंजऱ्यांसह औरंगाबादेत दाखल झाले. या पथकात एकूण सात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी या पथकाचे स्वागत केले. शनिवारी सकाळी पथक वाघांच्या जोडीला घेऊन मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहे.