शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विद्यापीठ अधिसभा पदवीधर गटाच्या १० जागांसाठी मतदानाला सुरुवात; सकाळचे सत्र संथ

By योगेश पायघन | Updated: November 26, 2022 12:09 IST

विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यात ५१ केंद्रातील ८२ बूथवर ५३ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे.

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीधर गटातील अधिसभेच्या १० जागांसाठी ४ जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात मतदारांचा मतदानाला तुरळक प्रतिसाद दिसत आहे. केंद्राबाहेर बुथवर गर्दी तर मतदान केंद्रात शुकशुकाट अशी स्थिती आहे. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यात ५१ केंद्रातील ८२ बूथवर ५३ उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी एकूण ३६ हजार ६८२ मतदार आहेत. कुलगुरू डॉ प्रमोद येवले, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, बेगमपूराचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार हे विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवून आहेत.   निवडणूक विभागात वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपले नाव, नोंदणीक्रमांक टाकल्यास मतदारांना केंद्र समजणार आहे. मतदान केंद्राबाहेर उत्कर्ष, विद्यापीठ विकास मंच, परिवर्तन पॅनल ने बूथ लावले असून उमेदवार, मतदान प्रतिनिधी, राजकीय नेतेमंडळी हजेरी लावून मतदानाची परिस्थिती जाणून घेत आहे. तर फोन करून मतदानाला या म्हणून मतदारांना विनंती करण्यात येत आहे.या निवडणुकीत मतदारांना प्राधान्यक्रम लिहून मतदान करायचे आहे. ते कसे करावे हेही समजवण्यात केंद्रावरील कार्यकर्ते व्यस्त आहेत.

५३ उमेदवार रिंगणातखुल्या प्रवर्गासाठी ५ जागांसाठी २९ उमेदवारांची पांढऱ्या रंगाची मतपत्रिका आहे. राखीव गटातून प्रत्येकी एका जागेसाठी अनुसूचित जातीसाठी फिकट निळ्या रंगात ७ उमेदवारांची मतपत्रिका आहे. अनुसूचित जमातीसाठी पिस्ता रंगात ४ उमेदवारांची मतपत्रिका, भटके विमुक्त जाती-जमातीच्या ५ उमेदवारांसाठी फिकट हिरव्या रंगाची मतपत्रिका आहे. इतर मागास वर्गासाठी फिकट पिवळ्या रंगाच्या मतपत्रिका असूनमहिला गटासाठी फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका आहे. दोन्ही गटात प्रत्येकी चार उमेदवार आहेत.औरंगाबाद जिल्ह्यात १६ केंद्रावर १७, ७६५ मतदार, बीड जिल्ह्यात १६ केंद्रावर १२,५९३ मतदार, जालना जिल्ह्यात ९ केंद्रावर ३,९९३ मतदार, उस्मानाबाद १० केंद्रावर २,५३१ मतदार आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद