शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे झुकलाय : हर्षवर्धन पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:54 IST

समाजाचा कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही

औरंगाबाद : मतदारांचा कल काँग्रेस महाआघाडीकडे वाढत असून, महाआघाडीच्या जागा वाढल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ पाटील हे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत भाजप-सेना महायुतीच्या सरकारने कुठल्याच आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे समाजातील कुठलाच घटक शासनाच्या बाजूने नाही.

स्थानिक पातळीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना जाहीर सभेसाठी व प्रियंका गांधी यांना रोड शोकरिता विनंती केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची मागणीही होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. नोकऱ्यांची घटत चाललेली संख्या, शेतकरी कर्जमाफी, राफेल विमान खरेदी घोटाळा, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण, जीएसटी, महागाई, दुष्काळ आदी मुद्यांवरून पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला.  प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, माजी आमदार एम.एम. शेख, अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया व डॉ. पवन डोंगरे  उपस्थित होते.

खैरे हेच शहराच्या अधोगतीला जबाबदारकाँग्रेस सरकारने बांधलेल्या जायकवाडी धरणातून वीस वर्षांमध्ये खा. चंद्रकांत खैरे यांना  शहरासाठी पाणी आणता आले नाही. गेली २० वर्षे खैरे संसदेत आहेत? पण संसदेत त्यांनी कधी २०मिनिटेही भाषण केले नाही. त्यांनी  केलेले एक तरी काम दाखवावे, असे आव्हानच हर्षवर्धन पाटील यांनी दिले. या शहराच्या अधोगतीला खा.खैरे हेच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. ते म्हणाले  की, काँग्रेसच्या विचारांमुळेच औरंगाबादचा हा परिसर दिसतो आहे. कॅन्सर हॉस्पिटल, लॉ कॉलेज, शहराला औद्योगिक स्वरूप देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आज औरंगाबादकर पाणी पाणी करीत आहेत. पण बाजूच्या जायकवाडी धरणातून खैरेंना हे पाणी आणता आले नाही.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेस