शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छानिवृत्ती घेईन; पण तुमच्या वॉर्डात काम करणार नाही; शिवसेनेच्या नगरसेवकाने महापौरांवर भिरकावला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:37 IST

: ‘स्वेच्छानिवृत्ती घेईन; पण तुमच्या वॉर्डात काम करणार नाही,’ असे वक्तव्य करून महापालिका कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी अपमान केल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर सर्वसाधारण सभेदरम्यान राजीनामा भिरकावला. या सगळ्या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ उडाला. महापौरांनी सुरे यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली.

ठळक मुद्देसत्ताधारी विरोधात सत्ताधारी : आयुक्तांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत

औरंगाबाद : ‘स्वेच्छानिवृत्ती घेईन; पण तुमच्या वॉर्डात काम करणार नाही,’ असे वक्तव्य करून महापालिका कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी अपमान केल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांनी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर सर्वसाधारण सभेदरम्यान राजीनामा भिरकावला. या सगळ्या प्रकारामुळे सभागृहात एकच गदारोळ उडाला. महापौरांनी सुरे यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केली.महापालिकेला कंत्राटदारांचे १८२ कोटी रुपये देणे आहेत. पैसे मिळत नसल्यामुळे कंत्राटदारांनी बहुतांश कामे अर्धवट सोडली आहेत. त्यातच किरकोळ दुरुस्तीची कामेदेखील होत नसल्याने नगरसेवकांना नागरिक बोलत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांना मनपासमोर उपोषण करावे लागत आहे.बुधवारी सभेला सुरुवात होताच शिवसेनेचे त्र्यंबक तुपे, रावसाहेब आम्ले, सीताराम सुरे, मीना गायके, सुरेखा सानप, सीमा खरात, आत्माराम पवार यांनी वॉर्डातील कामे होत नसल्याची ओरड केली.भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत अभिनंदनाचा ठराव मांडत असताना, त्यांना रोखत कसले अभिनंदन करता, इथे एकही काम होत नाही? अशी भावना नगरसेवक सुरे यांनी व्यक्त केली. महापौरांनी सुरे यांच्या वॉर्डातील दूषित पाण्याची समस्या, बंद पथदिवे सुरू करण्यासंदर्भात फायली सभागृहात मागवून घेण्याच्या सूचना केल्या. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दुपारी त्या फायली सभागृहात आणल्या. अ‍ॅन्टीचेम्बरमध्ये बसून निर्णय घेण्याचे आदेश शहर अभियंता एस.डी. पानझडे, कोल्हे यांना महापौरांनी दिले. फायलींसह दोन्ही अभियंते अ‍ॅन्टीचेम्बरमध्ये गेल्यानंतर सुरेही आत गेले. चेम्बरमध्ये सुरे आणि कोल्हे यांच्यात वाद झाला. चेम्बरमधून सुरे रागाने बाहेर आले व त्यांनी राजीनाम्याची प्रत महापौरांच्या दिशेने भिरकावत ते सभागृहाबाहेर निघून गेले. या प्रकरणात महापौरांनी सभा तहकूब करून आयुक्तांसमवेत बैठक घेतली.मी स्वेच्छानिवृत्ती घेतोवॉर्डात जुन्या सिमेंटच्या पाईपमुळे दूषित पाण्याच्या तक्रारी असून, ते पाईप काढून डीआय पाईप टाकण्यात यावेत, अशी सुरे यांची मागणी आहे. त्या कामाची संचिका मंजूर होईल या अपेक्षेने सुरे अ‍ॅन्टीचेम्बरमध्ये गेले होते. हे काम करा; अन्यथा १४ फेब्रुवारीला राजीनामा देतो, असा इशारा सुरे यांनी कोल्हे यांना दिला. त्यावर कोल्हे म्हणाले, त्यापूर्वी मी १३ फेबु्रवारीलाच स्वेच्छानिवृत्ती घेतो, असे शब्द वापरल्याचा दावा सुरे यांनी केला. यावर कोल्हे यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही.भामट्यासारखे बोलण्याची लाज वाटू लागली आहेजयभवानीनगरच्या भाजप नगरसेविका मनीषा मुंडे यांनी नाल्यासह रखडलेल्या विविध कामांवरून प्रचंड संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, भामट्यासारखे यायचे आणि बोलून निघून जायचे; परंतु काम काही होत नाही. चार वर्षांपासून त्या प्रश्नांसाठी भांडायची आता लाज वाटू लागली आहे. महापौरांनी सोमवारी त्यांच्या वॉर्डातील कामे मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारण