शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मित्राचे लग्नाच्या आमिषाने शिक्षिकेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 15:08 IST

रूणाविरोधात बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद: इन्स्टाग्रामवर भेट झालेल्या मित्राने पुण्यातील शिक्षिकेला लग्नाचे आमिषाने औरंगाबादेत बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. एप्रिल महिन्यात समर्थनगर येथील फ्लॅटवर झालेल्या अत्याचाराविषयी तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आरोपी तरूणाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

सतीश भगवान घोरपडे(रा. समर्थनगर, मूळ रा.परभणी) असे गुन्हा नोंद झालेल्या तरूणाचे नाव आहे. आरोपी हा स्पर्धा परिक्षेची तयारी करतो तर तक्रारदार ही पुण्यात शिक्षिका आहे. तक्रारदार तरूणीचे इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर अकाऊंट आहे.  फेब्रुवारी महिन्यात तिला सतीशने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याचे प्रोफाईल पाहिल्यानंतर पंधरा दिवसानंतर तिने सतीशची फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केली. दोघे परस्परांना मेसेज पाठवू लागले. दरम्यान त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर दोघे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवू लागले, फोनवर बोलू लागले.

या दरम्यान सतीशने त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे आणि तिच्याशिवाय तो जगू शकत नसल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर दोघे लग्न करू आणि आयुष्यभर जीवनसाथी म्हणून राहू असे तो म्हणाला. त्याचा लग्नाचा प्रस्ताव तिने स्विकारला. १४ एप्रिल रोजी सतीशने तिला भेटण्यासाठी औरंगाबादेत बोलावले. याकरीता त्याने तिचे बसचे तिकिटही पाठविले होते. ती औरंगाबादेत आल्यानंतर सतीशने तिला   समर्थनगर येथील त्याच्या फ्लॅटवर नेले. तेथे त्याच्या मित्रांसोबत तिची ओळख करून दिल्यानंतर त्याचे मित्र फ्लॅटमधून बाहेर गेले. तेव्हा सतीशने तिच्यासोबत बळजबरीने शरिरसंबंध ठेवल्याचे तरूणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. सतीश लग्न करणार असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून तिने याविषयी तक्रार केली नव्हती. दुसºया दिवशी त्याने तिला पुण्याला नेऊन सोडले. यानंतर पुणे येथेही तरूणीच्या घरी त्याने तिच्यावर अत्याचार केला.

तरूणीकडून उकळले ६० हजार रुपयेसतीश तिच्याकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी पैशाची मागणी केली.  यावरून त्यांचे भांडणही झाले होते. त्याने तिच्याकडून ६०हजार रुपये उकळले. तो तिला बदनामी करण्याची धमकी देवू लागला.मात्र सोसायटीत बदनामी होईल म्हणून तरूणीने याविषयी कोणाकडेही वाच्यता केली नाही.लग्नास नकार,देत केली मारहाणलग्न करणार म्हणून त्याला सर्वस्व देणा-या तरूणीचा शेवटी सतीशने विश्वासघात केला. सिनेमाला गेल्यानंतर त्याचे दिवाळीमध्ये दुस-या मुलीसोबत लग्न असल्याचे तिला म्हणाला. यावेळी झालेल्या भांडणात त्याने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर तो औरंगाबादला निघून आला. यानंतर तरूणीने सिंहगड ठाण्यात गुन्हा नोंदविला. घटना औरंगाबादची असल्याने पुणे पोलिसांनी हे प्रकरण क्रांतीचौक पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी