शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

नियमांची पायमल्ली! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गायरान जमिनीचा वर्ग बदलण्याचा सपाटा

By विकास राऊत | Updated: April 26, 2025 13:03 IST

शासनाने गायरान जमीन प्रकरणात नजराणा रक्कम कुठे, किती घ्यावी, यासाठी नियमावली ठरविलेली असताना, त्या नियमांना फाटा देण्यात येत आहे

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वर्ग-२ मध्ये असलेल्या गायरान जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याचा सपाटा जिल्हा प्रशासनाने लावला आहे. नियमांची पायमल्ली करून निर्णय होत असल्यामुळे शासनाचा महसूल देखील यात बुडत असल्याची चर्चा सुरू आहे. काही जमिनींसाठी २५, ५० टक्के तर काही जमिनींसाठी ७५ टक्के रक्कम जमिनीच्या मूल्याच्या तुलनेत नजराणा म्हणून घेतली जात आहे. शासनाने गायरान जमीन प्रकरणात नजराणा रक्कम कुठे, किती घ्यावी, यासाठी नियमावली ठरविलेली असताना, त्या नियमांना फाटा देण्यात येत असल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये चिकलठाणा, खुलताबाद, वाळूज परिसरातील प्रकरणांचा समावेश आहे.

काही निर्णय सहा-सहा महिन्यांपासून धूळ खात पडले आहेत, तर काही निर्णय महिन्याभरात होत आहेत. तसेच, मागील १५ वर्षांपासून काही प्रकरणे अडगळीला होती. त्या प्रकरणांत निर्णय घेऊन गायरान जमिनी नियमानुकूल करण्याचा सपाटा सुरू आहे. तसेच ज्या जमिनी मनपा किंवा प्राधिकरणाच्या हद्दीत आहेत, त्यांचा निर्णय जिल्हा प्रशासन घेत असल्याने संशयकल्लोळ वाढला आहे. २०१९ ते २०२२ दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था, प्रादेशिक विकास आराखडा, कृषी प्रयोजन व इतर जमिनींसाठी शुल्क निश्चितीचे प्रमाण शासनाने ठरवून दिले होते. यामध्ये शासकीय धोरणानुसार वेळोवेळी बदल होत गेल्याने त्याआधारे निर्णय होत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

चलनामध्ये तफावत...काही प्रकरणांमध्ये २५ टक्के, तर काही जणांना ५० टक्के तर काही निर्णयात ७५ टक्के शुल्क भरून घेण्यात आले. काही आदेशांमध्ये फक्त चलन क्रमांक आहे, त्यापुढे तारीख व इतर बाबींचा उल्लेख नाही. नजराणा रक्कम काही प्रकरणात जास्त तर काही प्रकरणात कमी दाखविण्यात येत आहे.

झोन दाखला नाही...काही प्रकरणात मंजुरी देताना झोन दाखला काढलेला नाही. जमिन २०११ च्या पुर्वीची आहे की, नंतरची आहे. मुळ गायरान धारकाची आहे की नाही, याची काहीही शहानिशा केलेली नाही. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये नियमानुकूल झाल्यानंतर जमिनीचे भाव वाढतात. ज्यांच्या नावे जमिनी आहेत, त्यांना तुटपुंजी रक्कम देऊन यात दलाली करणारी यंत्रणा गब्बर होत चालल्याचे दिसते आहे.

प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे....गायरान जमिनींवर १९९१ पर्यंत असलेली अतिक्रमणे अधिकृत आहेत, त्यानंतरची नाहीत. २०११ साली शासनाने न्यायालयीन निकालाचा आधार घेत अतिक्रमणे नियमित न करण्याचे आदेश काढले. सध्या सौरऊर्जा, महामार्ग, तलाव प्रकल्पांसाठी जमिनी घेऊन गरजवंताना गायरानांवरून हुसकावून लावण्यात येत आहे. अशातच गायरानांची जमिन नियमानुकूल करण्यात काही संशय कल्लोळ होत असेल तर प्रशासनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे.- प्रा. राम बाहेती, कार्याध्यक्ष लालबावटा शेतकरी युनियन

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर