कन्नड आगाराने कन्नडमार्गे बाजारसावंगी, फुलंब्री तसेच नागापूर, करंजखेडा, पिशोर, जैतखेडामार्गे बाजारसावंगी, फुलंब्रीमार्गे औरंगाबाद अशा डोंगराळ मार्गावर लालपरीची सेवा सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सरपंच आप्पाराव नलावडे, माजी सरपंच भीमराव नलावडे, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कन्नड आगाराने फुलंब्री मुक्कामी बससेवा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोहन राजपूत, पोपट काटकर, प्रकाश नलावडे, सय्यद लाल, अलीयार पठाण, भिक्कनराव घुले, आसाराम नलावडे, कृष्णा घुले, आझहर आतार, बबन नलावडे आदी उपस्थित होते.
लालपरीच्या चालक, वाहकांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:05 IST