सेनगाव : मागील तीन महिन्यांपासून रेशन दुकानदार रॉकेलचे वाटप करीत नसल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांची येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे तक्रार करत दुकानदाराची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.यासंबंधी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रेशन दुकानदार अशोक तोष्णीवाल यांनी गेल्या तीन महिन्यांपासून रॉकेलचे वाटपच केले नसून रॉकेलची विचारणा करण्यासाठी गेला तर उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करीत सदर दुकानदाराची चौकशी करावी, नियमित रॉकेलचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर शेख मुनीर, शेख चाँद, दगडू वानरे, जयकुमार महाजन, माणिक राऊत, रामजी वानरे, लक्ष्मण वानरे, नारायण अंभोरे, शेख करीम, शेख रफीक, शंकर वानरे, रायाजी वानरे, शेख शकील, जगन वानरे, शेख बाखर, आ्रश्रुबा पेनुरकर, कैलास दुकानदार, बबन हरणे, भारत महाजन, शंकर मुलंगे, कैलास फटांगळे, दिलीप महाजन, सुनील हलगे, भगवान बोराळकर, रामदास फटांगळे यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)
रॉकेलसाठी ग्रामस्थांची तक्रार
By admin | Updated: July 22, 2014 00:20 IST