शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

रेणापुरात पंचायत समितीच्या ४६ अधिकाऱ्यांचा गावभेटी कार्यक्रम

By admin | Updated: June 18, 2014 01:42 IST

रेणापूर : शासनाच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात तालुक्यातील पंचायत समितीच्या ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावभेटी कार्यक्रम हाती घेऊन यशस्वीरीत्या राबविला.

रेणापूर : शासनाच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात तालुक्यातील पंचायत समितीच्या ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावभेटी कार्यक्रम हाती घेऊन त्या-त्या गावांत मुक्काम करून गावातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यावर भर देऊन शासनाचा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला. शाळेत प्रवेश घेताना बालकांना उत्साही व आनंददायी वातावरण दिसले तर त्याचा शाळेकडील ओढा अधिक वाढेल. त्याअनुषंगाने शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी १५ जून २०१४ रोजी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात अधिकारी व कर्मचारी १५ जूनला मुक्कामी होते. त्या मुक्कामात गावाकडील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी घरोघरी भेटी देऊन शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन शालेय परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, शालेय पोषण आहार, स्कॉलरशीप परीक्षा, वृक्षारोपण, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, कृमिक पुस्तके, विद्यार्थी संख्या, साक्षर भारत आणि नियोजन, शाळेत येणाऱ्या मुलांचे स्वागत, शिवाय प्रभातफेरी काढून उपरोक्त कार्यक्रम राबविला गेला. कार्यक्रम राबविण्यासाठी गटविकास अधिकारी शाम पटवारी, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी येमुलवाड, गटशिक्षणाधिकारी ए.आर. भंडारी, बालविकास प्रकल्पाधिकारी आर.डी. तुबाकले, उपविभागीय अभियंता व्ही.एस. रबशेट्टी, विस्तार अधिकारी एस.जी. पुठ्ठेवाड, बी.पी. तेलंग, कृषी विस्तार अधिकारी बी.बी. सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी ए.व्ही. होळीकर, सुनापे यांच्यासह ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्या-त्या गावांत मुक्कामी राहून शासनाचा उपक्रम गावा-गावांत राबविला. सांगवी येथे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांनी केलेल्या मुक्कामात गावातील शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन गावातील अडीअडचणी जाणून घेतल्या. शिवाय, शासनाच्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगून प्रत्येक मूल शाळेत कसे जाईल, यावर भर दिला. सांगवी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने गावातील मध्यवर्ती भागातून प्रभातफेरी काढून आपली मुले शाळेत पाठवा, अशा जयघोषात विद्यार्थी वाढविण्यासाठी शाळेच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. (वार्ताहर)