शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

नसती उठाठेव ! मित्राच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीचे केले चित्रण; दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 18:06 IST

दोघांनी मोबाईलमध्ये विनापरवानगी गुप्तपणे छायाचित्रण केले.

औरंगाबाद : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. रामगडिया यांच्या कोर्टात सुनावणी सुरु असताना गुपचूप मोबाईलमध्ये न्यायालयीन कामकाजाचे छायाचित्रण करताना दोघांना पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयीन कामकाज सुरु असताना निखिल कल्याणराव काळे (वय २८, रा. जय भवानीनगर, मुकुंदवाडी) आणि आदित्य गजानन पळसकर (वय २१, रा. शिवाजीनगर, वार्ड नं. ६, मु्. पो. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा, ह. मु. एन ६ सिडको) यांनी व्हिडीओ शुटिंग केले. बुधवारी दुपारी २.४५ ते ३.३० यादरम्यान कोर्टात सुनावणी सुरू असताना निखिल काळे आणि आदित्य पळसकर यांनी स्वत:कडील मोबाईलमध्ये विनापरवानगी गुप्तपणे छायाचित्रण केले. शासकीय गोपनीयतेचा भंग केला म्हणून सहाय्यक फाैजदार राजपाल जाधव यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला. याशिवाय दोन्ही आरोपींकडून ४५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत.

मित्रासाठी केलेले चित्रीकरणमुकुंदवाडी पोलीस ठाण्यात एका माजी नगरसेवकाच्या मुलाविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात माजी नगरसेवक पुत्राला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी घेण्यात येत असताना त्याच्या दोन मित्रांनी हे चित्रीकरण केले. मित्रासाठी केलेले चित्रीकरण त्यांच्या अंगलट आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय