शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

video : चारशे रुपये द्या आणि दोनशेची पावती घ्या ; वेरुळ लेणी येथे पोलिसांकडून पर्यटकांची लुट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:16 IST

पोलिसांकडून परराज्यातून आलेल्या पर्यटकांकडे 'गाडी सोडायची असेल तर चारशे रुपये दे आणि दोनशेची पावती घे', अशी बिनधास्त मागणी करणारी घटना उघडकीस आली आहे.

औरंगाबाद : जगप्रसिध्द वेरुळ लेणी येथे पर्यटक आणि लेणी सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेले पोलिसच पर्यटकांची लुट करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून परराज्यातून आलेल्या पर्यटकांकडे 'गाडी सोडायची असेल तर चारशे रुपये दे आणि दोनशेची पावती घे', अशी बिनधास्त मागणी करणारी घटना उघडकीस आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पर्यटकांच्या होणाऱ्या लुटीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  

खुलताबाद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वेरुळ लेणी येथे एक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या लेणीच्या रक्षणासाठी व देश -विदेशातील पर्यटकांच्या समस्या सोडविण्यासाठी येथे कायम पोलीस कर्मचारी तैनात असतात. मात्र लेणी आणि पर्यटकांची सुरक्षा सोडून हे पोलीस पर्यटकांची नियमांच्या नावाखाली प्रचंड लुट करत आहेत. असाच एक प्रकार बुधवारी गुलबर्गा येथून आलेल्या पर्यटकांसोबत घडला. येथील पोलीस कर्मचारी शेख हारुण शेख रशिद याने लेणी पाहण्यासाठी आलेल्या या पर्यटकांची गाडी तपासणीच्या नावाखाली अडवली. पर्यटकाकडून गाडी सोडायची विनंती करताच, गाडी सोडायची असेल चारशे रुपये द्यावे लागतील मात्र पावती दोनशे रुपयाचीच मिळेल अशी बिनधास्त मागणी केली. 

यावर दोनशे रुपयांच्या पावतीसाठी चारशे रुपये का घेता? असा सवाल पर्यटकांनी केला, तर पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विशेष म्हणजे पोलीस स्वतः पावतीचे पैसे घेतात आणि वरचे पैसे झिरो पोलीसाकडे देण्यास सांगून पर्यटकांना सर्रास लुटत आहेत. हे सारे चित्रित झालेला एका व्हिडीओच सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत या प्रकरणातील पोलिस कर्मचारी शेख हारुण शेख रशिद याला निलंबित केले आहे. 

असे असेल तर आम्ही कसे यावे आपल्या अलौकिक रचनेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या वेरुळच्या  लेणीस पाहण्यासाठी फक्त राज्यभरातूनच नाही, तर देश आणि परदेशातून पर्यटक मोठ्याप्रमाणावर येथे येतात. मात्र या पर्यटकांना पोलिस कशी वागणूक देतात, याचेच विदारक चित्र या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल आहे. यावेळी पोलिसांच्या वागणुकीमुळे त्रस्त झालेले पर्यटक, 'तुम्ही असे कराल तर आम्ही कसे यावे' अशी आर्जव करतानाही दिसत आहे.हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पर्यटकांच्या होणाऱ्या लुटीबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.