शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Video : ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटाने रुग्णवाहिकेचा चुराडा; डॉक्टर व चालक बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 12:27 IST

Ambulance shattered by explosion of oxygen cylinder in Aurangabad : वाळूजजवळ १०८ रुग्णवाहिकेला अचानक आग लागून रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट होऊन रुग्णवाहिकेचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

ठळक मुद्देवाळूजजवळील घटनेत १०८ रुग्णवाहिका आगीत भस्मसातप्रसंगावधान राखल्याने डॉक्टर व चालक बालंबाल बचावले

वाळूज महानगर : इंधन भरण्यासाठी भेंडाळ्याकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ‘१०८’ रुग्णवाहिकेला गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरच्या स्फोटाने रुग्णवाहिकेचा अक्षरश: चुराडा झाला असून, प्रसंगावधान राखत डॉक्टर व चालकाने रुग्णवाहिकेतून वेळीच उडी मारल्याने दोघे सुदैवाने थोडक्यात बचावले.

गंगापूर तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८ रुग्णवाहिका (एमएच१४, सी.एल.०७९३) भेंडाळा येथून इंधन भरण्यासाठी बजाज ऑटोजवळील पेट्रोल पंपाकडे आली. त्यानंतर चालक सचिन गोरखनाथ कराळे (४२) व डॉ. प्रशांत पोपटराव पंडुरे (३९, दोघेही रा. गंगापूर) हे रुग्णवाहिका घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघाले. वाळूजजवळ सायंकाळी ४.३० च्या सुमारास चालक सचिन कराळे यांना काही तरी जळाल्याचा वास आल्याचे तसेच रुग्णवाहिकेतून धूर निघत असल्याचे दिसले. यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका उभी केली व डॉक्टर, चालक यांनी रुग्णवाहिकेतून खाली उड्या मारल्या. दरम्यान, क्षणार्धात रुग्णवाहिकेला आगीने वेढल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी या आगीची माहिती वाळूज पोलीस ठाणे व अग्निशमन विभागाला देऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

रुग्णवाहिकेचे टप ५० फुटांपर्यंत उडालेगरवारे कंपनीच्या अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेची आग विझविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर गरम होऊन मोठा स्फोट झाला. यामुळे रुग्णवाहिकेचे टप जवळपास ५० फूट उडाले. या भीषण स्फोटामुळे रुग्णवाहिकेचा अक्षरश: चुराडा झाला. केवळ रुग्णवाहिकेचे अवशेष शिल्लक राहिले. वाळूज अग्निशमन विभाग, बजाज ऑटो व गरवारे कंपनीच्या अग्निशमन वाहनांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. रुग्णवाहिकेला आग लागल्यानंतर औरंगाबाद-नगर महामार्गावर जवळपास अर्धा तास वाहतुकीची कोंडी होऊन दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी वाळूजचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा. निरीक्षक विनायक शेळके, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके आदींनी घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी मदत करीत वाहतूक सुरळीत केली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfireआग