शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘बाटू’चे कुलगुरू गायकर यांचा राजीनामा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:38 IST

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात्मक मागण्याही उच्चशिक्षण विभागाने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देराज्यपालांचा निर्णय : कुलसचिवांचा पदभार कायम; इतरही बदल होणार

औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) कुलगुरू डॉ. विलास जी. गायकर यांनी उच्चशिक्षण विभागाच्या कारभारला कंटाळून राज्यपालांकडे राजीनामा दिला होता. हा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. कुलगुरूंनी केलेल्या विकासात्मक मागण्याही उच्चशिक्षण विभागाने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.उच्चशिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून लोणेरे येथील ‘बाटू’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गायकर यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २१ आक्टोबर रोजी प्रकाशित झाले होते. उच्चशिक्षण विभागाने बाटूचे कुलसचिव डॉ. सुनील भांबरे यांच्याकडील पदभार काढत त्यांची नियुक्ती पेन येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी केली. डॉ. भांबरे यांच्याकडे प्राचार्य आणि कुलसचिव या दोन्ही पदांची जबाबादरी ठेवण्याची विनंती कुलगुरू डॉ. गायकर यांनी केली होती. मात्र, ही विनंती धुडकावून लावली. यामुळे संतापलेल्या डॉ. गायकर यांनी तडकाफडकी राज्यपालांकडे राजीनामा पाठविला. याचवेळी विद्यापीठात प्रकुलगुरू, वित्त व लेखाधिकारी, अधिष्ठाता, विभागीय संचालक यांच्यासह इतर सर्व पदे मंजूर असतानाही भरण्यास मंजुरी देण्यात येत नाही. विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयांसाठी जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास निधी देत नाहीत. याचवेळी राज्यातील तीन विधि विद्यापीठे, आयटीसीच्या विभागीय केंद्रासाठी जागा, निधी, पदे तात्काळ मंजूर केली जातात. ‘बाटू’सोबतच सरकार दुजाभावाने वागत असल्यामुळे त्रासलेल्या कुलगुरूंनी राजीनामा देण्याचे हे टोकाचे पाऊल उचलले होते. याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच खळबळ उडाली होती. शेवटी उच्चशिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे, सचिवांमध्ये बैठक झाल्यानंतर डॉ. गायकर यांना राजीनामा न देता काम करण्याची विनंती करण्यात आल्याचे समजते. तसेच डॉ. भांबरे यांची बदलीही थांबवत त्यांच्याकडे कुलसचिवपदाचा कार्यभार कायम ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.कोट,मी राजीनामा दिला होता. मात्र, माझ्या ज्या काही मागण्या होत्या. त्याबाबत सकारात्मक पावले उच्चशिक्षण विभागाकडून उचलण्यात आली आहेत. तसेच मला उर्वरित कालावधी पूर्ण होईपर्यंत कायम राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. सध्या तरी मी कार्यरत आहे.- डॉ. विलास गायकर, कुलगुरू, बाटू

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र