शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'स्पीड गन'मुळे वाहनधारक सोसताहेत भुर्दंड; नियमांतील विसंगतीने रोज होतोय खिसा रिकामा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:31 IST

वेग मर्यादेचे उल्लंघनाच्या नियम आणि वाहनांमधील गतीची मर्यादा वेगवेगळी, सुधारणेची आवश्यकता

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळी मर्यादा आणि त्याविषयी वाहनचालकांना सहज माहितीदेखील मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यावरून वाहनचालकांचा रोज खिसा रिकामा होत आहे. ९० किमीपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविता येत नसेल तर नव्या वाहनांना वेगमर्यादा का घातली जात नाही, असा संतप्त सवाल वाहनचालक विचारत आहेत.

औरंगाबाद ते सोलापूर आता काही तासांत, औरंगाबाद ते नागपूर प्रवासाचा वेळ होणार कमी, असा गाजावाजा करत रस्ता तयार करण्यात येतो. नव्या चारचाकी दाखल करताना वाहनांच्या गतीचा आवर्जून उल्लेख केला जातो. प्रत्यक्षात वाहनाची गती अधिक असल्याच्या कारणावरून महामार्ग पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

९० चे ९१ झाले, तरी कारवाईऔरंगाबाद जिल्ह्यात दोन स्पीड गन वाहनांच्या मदतीने महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते. मर्यादेपेक्षा एक किमी म्हणजे अगदी ९० चे ९१ किमी प्रतितास वेग वाढला, तरी एक हजार रुपयांचा दंड लावण्यात येतो.

फलक नाही, उतारावर का कारवाई ?ऐन उताराच्या रस्त्यावर आणि घाटात वाहनांच्या गतीची मोजणी करून कारवाई केली जाते. रस्त्यावर जागोजागी वेग मर्यादेसंदर्भात फलक लावण्याची गरज आहे. परंतु, ठराविक ठिकाणीच ते फलक दिसतात. मांजरसुंबा घाटात अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

वेगमर्यादा वाढवा, नाही तर वाहनांत बदल कराराष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर समतल भाग, घाट भाग, द्रुतगती मार्ग, मनपा क्षेत्र यानुसार ३० किमीपासून तर १०० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा आहे. काही रस्त्यांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे योग्य अभ्यास करून वेगमर्यादा वाढीची गरज आहे. नाही तर वाहनांचा वेगच वाढणार नाही, अशा प्रकारे वाहनांत बदल करण्याची अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

ऑक्टोबरमध्ये ६,९०६ वाहनचालकांवर कारवाईऑक्टोबर महिन्यात वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६९०६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना एकूण ६९ लाख ६ हजारांचा दंड लावण्यात आला. यात केवळ ८० वाहनचालकांनी दंड भरला.

काही रस्त्यावरील वेगमर्यादा- सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्ग- ९० किमी प्रतितास- औरंगाबाद - पुणे मार्ग -६० किमी प्रतितास

वेगमर्यादेचे पालन आवश्यकअपघात झाला तर वाहनचालकाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. स्पीड गनद्वारे वेगमर्यादेची कारवाई होते. त्यात मानवी हस्तक्षेप होत नाही.- डाॅ. दिलीप टिपरसे, पोलीस उपअधीक्षक,महामार्ग सुरक्षा पोलीस

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातRto officeआरटीओ ऑफीस