शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'सिद्धांत'ने २५ टक्के रक्कम न भरल्याने वेदांत हॉटेल मालमत्तेचा लिलाव झाला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:47 IST

लिलाव प्रक्रियेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कंपन्यांनी व्यक्त केली इच्छा

छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्टेशन रोडवरील वेदांत हॉटेल मालमत्तेच्या लिलावातून माघार घेतल्याचे पत्र सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाईज या कंपनीने सादर केले नाही. २५ टक्के रक्कम भरण्यासाठी शुक्रवार २० जून ही शेवटची मुदत होती. मुदतीच्या आत रकमेचा भरणा झाला नसल्याने लिलाव रद्द झाला, असे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात प्रशासनाने वेदांत हॉटेल मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया राबविली. त्यात सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाईज कंपनीने सर्वोच्च बोली लावली. मात्र, विरोधी पक्षाने लिलाव प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर ‘सिद्धांत’ने या प्रक्रियेतून माघार घेतली. ‘सिद्धांत’च्यावतीने लगेचच माघार घेतल्याचे प्रशासनाला पत्र देईल, असेही जाहीर करण्यात आले होते. परंतु, त्यांच्याकडून माघारीचे पत्र प्रशासनाकडे आले नाही. दरम्यान, लिलाव प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या निर्मल हॉलिडे होमने सिद्धांतने लावलेल्या सर्वोच्च बोली एवढ्या किमतीत हॉटेल खरेदी करण्याची इच्छा लेखी स्वरूपात प्रशासनाला कळविली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने देखील बोलीपेक्षा ५ लाख रुपये जास्त म्हणजे ६४ कोटी ८८ लाख रुपयांत खरेदी करण्याची इच्छा लेखी स्वरूपात कळविली आहे.

पुढच्या आठवड्यात अहवाल देऊसिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाईज कंपनीला २० जूनपर्यंत २५ टक्के रक्कम भरण्यास सांगितले होते. परंतु, त्यांनी पैसे न भरल्याने लिलाव प्रक्रिया रद्द झाली आहे. इतर दोघांनी जुन्या बोलीपेक्षा अधिक रकमेत ती मालमत्ता खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. याचा २५ जून रोजी न्यायालयासमोर अहवाल सादर केला जाईल. न्यायालयच विक्री किंवा नव्याने लिलाव प्रक्रियेबाबत निर्णय घेईल. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पुढील कार्यवाही होईल.- डॉ. व्यंकट राठोड, उपविभागीय अधिकारी.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSanjay Shirsatसंजय शिरसाट