शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीत बीड महसूल अव्वल

By admin | Updated: April 1, 2015 01:01 IST

बीड: विविध विविध प्रकारच्या कर वसुलीची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली होती. शासनाकडून बीड महसूल विभागाला ५० कोटी २१ लाख रूपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले होते

बीड: विविध विविध प्रकारच्या कर वसुलीची मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरू केली होती. शासनाकडून बीड महसूल विभागाला ५० कोटी २१ लाख रूपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा चाळीस लाख रूपयांची जास्त वसुली बीड महसूल विभागाने केली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड महसूल विभाग वससुलीमध्ये अव्वल असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी सांगितले.मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन विभाग वसूलीच्या मोहीमेसाठी सरसावला होता. ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा हिशोब ताळेबंद करणे आवश्यक असते. यानुसार शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली बीड महसूल विभागाने केली आहे. यामध्ये जमीन महसूल कर, जि. प. कर, कृषी कर, मोजणी शुल्क, करमणूक कर, शिक्षण व गौण खनिज कर यांचा समावेश असल्याचे वरिष्ठ अव्वल कारकून इसहाफोद्दीन सय्यद यांनी सांगितले. कर वसूली मोहीमेसाठी बीड जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी तहसीलदार यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. यावर्षी शासनाने दिलेले उद्दिष्ट ५० कोटी २१ लाख ४१ हजार एवढे होते तर बीड महसूल विभागाने ५० कोटी ९२ लाख ७५ हजार रूपयांचा कर वसूल केला असून याची टक्केवारी १०१.४२ एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत चांगल्या प्रकारे महसूल कर वसूली झालेली आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड पहिल्यांदाच अव्वल राहिलेले आहे. (प्रतिनिधी)