शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

वाशीत सेना तर परंड्यात राष्ट्रवादीने दाखविली ताकद

By admin | Updated: October 23, 2014 00:15 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद परंडा विधानसभा मतदार संघामध्ये खऱ्याअर्थाने तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. राहुल मोटे यांनी शिवसेना

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादपरंडा विधानसभा मतदार संघामध्ये खऱ्याअर्थाने तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. राहुल मोटे यांनी शिवसेना उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, रासप उमेदवार बाळासाहेब हाडोंग्रीकर यांच्यावर मोठ्या फरकाने मात करीत हॅट्ट्रीक साधली. मात्र, यावेळी एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या गडाला सुरूंग लावल्याचे प्रकर्षाने जानवते. काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या वाशी शहरातून शिवसेनेला तर राष्ट्रवादीची हुकुमत असलेल्या भूम शहरामध्ये रासपला मताधिक्य मिळाले. असे असतानाच शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या परंडा शहरामध्येही राष्ट्रवादीने ताकद दाखवून दिल्याचे दिसते.परंडा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीसोबतच शिवसेना, रासप आणि काँग्रेस पक्षानेही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. भूम, वाशी आणि परंडा या शहरामध्ये असलेल्या मतदानाची संख्या लक्षात घेता या प्रमुख पक्षांनी ग्रामीण भागासोबतच शहरांवरही लक्ष केंद्रित केले होते. आपापले गड राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. भूम शहराला राष्ट्रवादीचा गड समजले जाते. कारण नगर परिषद आणि पंचायत समिती ही दोन्ही सत्ताकेंद्र राष्ट्रवादीकडे आहेत. ग्रामीण भागासोबतच शहरातूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांना मोठे मताधिक्य मिळेल, असे कार्यकर्ते सांगत होते. परंतु, कार्यकर्त्यांचे हे गणित रासपने काहीअंशी का होईन बिघडविल्याचे घेतलेल्या मतदानावरून दिसून येते. बाळासाहेब हाडोंग्रीकर यांना शहरातील तेरा बुथवर मिळून ४ हजार ७६ मते मिळाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. मोटे यांना ३००३ मिते मिळाली. येथून सेनेलाही मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. परंतु, रासपमुळे सेनेचा अपेक्षाभंग झाला. सेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना अवघ्या १ हजार ३२५ मतांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस पक्षाचे नुरोद्दीन चौधरी यांना अवघी १ हजार २१ मते मिळाली.वाशी हे शहर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. वाशी ग्रामपंचायत काँग्रेसच्या चेडे गटाकडे आहे. प्रशांत चेडे हे स्वत: जिल्हा परिषद सदस्य आहेत. मात्र याच बालेकिल्यात काँग्रेस पक्षाच्याच उमेदवाराला मोठा फटका सहन करावा लागला आहे. नुरोद्दीन चौधरी यांना १ हजार मतेही मिळू शकली नाहीत. अवघ्या ५२७ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. याच्या उलट शिवसेना उमेदवार पाटील यांच्या पारड्यात मात्र घसघसीत मते पडली. २ हजार ६२० मते घेवून त्यांनी राष्ट्रवादीसोबतच रासपच्या उमेदवारालाही ओव्हरटेक केले. दुसरीकडे राष्ट्रवादीला १ हजार ७८१ तर रासपला १ हजार ६६४ मते पडली. एकूणच काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. दरम्यान, परंडा हा पूर्वीपासून शिवसेनेचाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील पंचायत समिती आणि नगर परिषद दोन्ही सत्ता केंद्र सेनेच्या हातात आहेत. त्यामुळे येथून शिवसेना उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल असा पदाधिकाऱ्यांसोबतच कार्यकर्त्यांनाही ठाम विश्वास होता. तर काँग्रेसचे उमेदवार नुरोद्दीन चौधरी यांच्यामुळेही राष्ट्रवादीच्या मतात फुट पडेल असे बोलले जात होते. त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांतून आकडेमोड केली जात होती. मात्र मतदारांनी काही प्रमाणात सेनेला झुकते माप दिले असले तरी हा फरक फारसा नाही. शिवसेनेला १४ बुथवर ३ हजार ७६० इतकी मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ हजार ५१९ मते पडली. रासपचे उमेदवार हाडोंग्रीकर यांना हजारीही गाठता आली नाही. ९६० मतांवर त्यांना समाधान मानावे लागले. हीच परिस्थिती काँग्रेस उमेदवार चौधरी यांची झाली. होमपिचवर त्यांना अवघी ८३२ मते पडली. त्यामुळे कार्यकर्त्यांतून करण्यात आलेली आकडेमोड साफ फोल ठरली. एकूणच या तीनही शहरांमध्ये एका पक्षाने दुसऱ्याच्या बालेकिल्याला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.