शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

‘चहाडीची गोडी नाकारणारी वसेकरांची कलमी कविता’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:05 IST

रसगंध : विश्वास वसेकरांचा ‘कलमी कविता’ हा अलीकडेच प्रसिद्ध झालेला विडंबन काव्यसंग्रह नुकताच वाचला आणि विडंबन काव्याची/व्यंग कवितांची एक समृद्ध परंपरा मराठी कवितेला लाभली. त्याचा मिश्किल इतिहास मनात जागा झाला. तिरकस शैलीचे कवी/ लेखक/ व्यंगचित्रकार आणि त्यांना दाद देणारे खट्याळ इरसाल वाचक. हे जणू एकमेकांना खतपाणी पुरवीत, साद-प्रतिसाद देत, आनंद घेत, एक दुस-याची खेचत, खिल्ल्या उडवत, डोळ्याच्या कडा ओल्या होई तो हसत, चिमटे काढून टाळ्या देत-घेत. एक जिवंत खळखळणारं आयुष्य जगणारा समाज डोळ्यासमोर उभा राहिला.

- डॉ. संजीवनी तडेगावकर

रविकिरण मंडळाच्या अतिरेकी काळात प्र. के. अत्रेंची ‘झेंडूची फुले’ फुलून आली. अनेक कवींच्या कवितांवर झेंडूची फुलेतून त्यांनी खुमासदार शैलीतून व्यंग निर्माण केले. कवींनी जणू अत्रेंचा धसका घ्यावा, अशी काहींशी स्थिती निर्माण झाली. त्यावेळी मूळ कलाकृतीपेक्षाही अत्रेंचे ‘झेंडूची फुले’तील विडंबनेच जास्त गाजले.

सामाजिक दंभावर नेमकेपणाने व्यंगात्मक भाष्य करून चिं. वि. जोशी, ज. के. उपाध्ये, अनंत काणेकर, गं. ना. जोगळेकर, पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदे, अशोक नायगावकर आणि विश्वास वसेकर यांनी (विनोदी लेखनाचा) हा वाङ्मय प्रकार समृद्ध आणि लोकप्रिय केला. मात्र, गीतकाव्यासारखीच याची नोंद मराठी समीक्षेत दिसत नाही. विनोदी साहित्याची समीक्षा न करता येणे हा मराठी समीक्षेचा आणि समीक्षकांचा पराभव समजावा काय? कारण मागील वर्षी जागतिक पातळीवर गीतकाव्य प्रकाराला बॉब डिलन यांना नोबेल पारितोषिकाने गौरविले गेले आणि भारतीय (मराठी) साहित्यात मात्र ‘उथळ’ म्हणून सतत त्याची हेटाळणी केली जाते. असो.

कलमी कवितांच्या माध्यमातून वसेकरांनी अनेक दिग्गज कवींच्या कवितांचे विडंबन करून खळबळ उडवून दिली आहे. पु. शि. रेगे, बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, यशवंत मनोहर, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, ग्रेस आदींच्या कविता तर भन्नाट जमल्या आहेत.ग्रेस यांच्या एका कवितेचे विडंबन करताना ते म्हणतात,

तो दीड वाजला होतामी सव्वा कैसे म्हटलेकी राधेच्या चुनाचेसीतेने केले पिठले...मी कथेस गेलो नाहीहा पाऊस असला पडतोशाळेस वेध जरी नाहीअंदाजामागून गळतो.

निखळ हास्यनिर्मिती हीच विडंबनाची प्राथमिक अट असते. ही फलश्रुती नसेल तर विडंबन बटबटीत होऊन अभिरुचीहीन होते. उपहास- उपरोधामधून वाचकाला अंतर्मुख करणारा हा काव्य प्रकार असून कवितेचे अस्सल रूप निस्तेज होऊ लागले की, विडंबने प्रभावी ठरू लागतात. विपरीत  कल्पनांचा अतिरेक, सांकेतिकतेचा बुजबुजाट, अनुकरणाचा थाट, बाह्यांगाला अतिमहत्त्व, साहित्य- संस्कृती-राजकारणाचे हिणकस रूप विडंबनाच्या निर्मितीला कारणीभूत ठरते. त्याचे मासलेवाईक उदा. नारायण सुर्वे यांच्या ‘पत्रात लिवा’ या कवितेचे वसेकरांनी केलेल्या विडंबनातून पाहता येईल. अर्थात ‘अटलजींचे’ जयललितास पत्र या मथळ्याखाली ते केले आहे.

मव्हा पाठिंबा असाच ठिवा, असं पत्रात लिवानाना नमुने गोळा करून, म्या धकवतोय कसा तरीपरतेका लूट पाह्यजे.  पुढारी का पेंढारी?लुटू देऊ का खुर्चीहून हटू... काय ते पत्रात लिवा.

आता कुठं आम्ही सत्तेत आलो, संपल कशी वखवखी अतीच खाल्ले तुम्ही म्हणून तर तुमची ही पोटदुखी ववा पाठवून देऊ का नकू, काय ते पत्रात लिवा...वाढती गटबाजी, ढोंग, भल्याभल्यांचा सुटत जाणारा विवेक पाहून मन खिन्न होते, तेव्हा हसण्याशिवाय हातात काहीच राहत नाही. त्या हसण्यातून विडंबनाचे बीज (व्यंगकाव्याचे) असते.

सत्यकथा या नियतकालिकात साहित्य छापून आल्यावर सत्यकथेचे लेखक म्हणून मिरवणाºयांच्या कंपूशाहीला कंटाळलेल्या विरोधी गटातील लेखकांनी ‘सत्यकथा’ बंद पडल्यावर ‘आता सत्यकथेचे लेखक विधवा झाले’ असे उपरोधाने म्हटले होते. त्याच धर्तीवर ‘सत्यकथा बंद पडली तेव्हाची गोष्ट’ अशा आशयाची एक मजेशीर कविता या संग्रहात वाचायला मिळते. त्याचप्रमाणे बा. सी. मर्ढेकरांच्या ‘दवात आलीस भल्या पहाटे’ या  लोकप्रिय कवितेचे विडंबन करताना ते लिहितात...

दवात आलीस भल्या पहाटेभुतासारखी उठून एकदाचिथवून गेलीस पेरीत आपुल्याकुटुंबक्षोमामधील सुरुंगाकिंवा;

 ना. धों. महानोरांच्या ‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे’ या कवितेचे केलेले विडंबन असे;ह्या मुलीने ह्या मुलाला पान द्यावेआणि माझ्या मत्सराला पूर यावेपाहता लिपस्टिक शर्टी लागलेलीकॉलरीला मीही त्याच्या आवळावे.

या आणि अशा अनेक कवींच्या कवितेवर वसेकरांनी ‘कलमी’ कविता’ मधून विडंबन काव्य केले आहे. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव, गंगाधर पानतावणे, प्रभाकर बागले, सरदेशमुख आदींनी गौरवलेली कविता वसेकरांनी ‘कोरस’, ‘काळा गुलाब’, ‘पैगाम’, ‘शरसंधान’, ‘मालविका’, ‘अंकोरवट’, ‘पोर्ट्रेट पोएम’, ‘तरी तुम्ही मतदार राजे’ या कविता संग्रहातून लिहिली असून ‘रेघोट्या’ ‘कु-हाडीचा दांडा’, ‘सुखाची दारं, आदी ललितलेखसुद्धा त्यांचे प्रकाशित आहेत. गंभीर लेखनासोबतच विनोदी शैली हा वसेकरांचा नैसर्गिक स्वभाव आहे. विनोदी लेखनासाठी जशी विनोदबुद्धी लागते, तसाच हजरजबाबीपणा व भाषेवर प्रभुत्वदेखील! शिवाय समकालीन राजकीय घडामोडींचा अभ्यास व साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचे संदर्भसुद्धा माहीत असणे गरजेचे असते.विडंबन काव्यात मूळ कलाकृतीचा फक्त सांगाडा वापरला जातो. मूळ कवी किंवा कविता टीकेचे लक्ष नसते. ज्या कवितेचा ढाचा वापरून विडंबन काव्य केले जाते तिच्या माध्यमातून समाजातील सूक्ष्म घडामोडी, अंतर्गत ताणेबाणे, हितसंबंध, एखाद्याचे वेगळेपण, हेवेदावे, हिणकस व्यवहार, गोपनीय गोष्टी, असा विविधांगी मालमसाला ध्वनित होत राहतो. जसे कोणत्याही चांगल्या काव्यात ध्वनित बेन्साला महत्त्व आहे, तसेच विडंबनातदेखील आहे. या संग्रहाला डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रदीर्घ प्रस्तावना असून वसंत सरवटे यांचे मुखपृष्ठ आणि साजेशा व्यंगचित्रांचा वापर हे या पुस्तकाला आणखी संदर्भ पुरवीत राहतात. गंभीर लेखनासोबतच वसेकरांनी स्वत:मधील खट्याळ लेखक जिवंत ठेवल्यामुळे विनोदी साहित्याची मेजवानी  वाचकांना मनमुराद आनंद देईल. (लेखिका जालना येथील कवयत्री आहेत.)