कचनेर : श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे रविवारी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता बोलीया होऊन ११ वाजता भगवंताचा पंचामृत अभिषेक, नित्यनियम पूजा होईल. यावेळी आर्यिका सुभूषणमती माताजी ससंघ उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी भगवंताची आरतीही करण्यात येणार आहे. प्रेमचंद, मनोरमाबाई कमलेश किरण पांडे परिवार गवळी शिवरावाला औरंगाबाद यांच्या वतीने महाप्रसाद दिला जाणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्राच्या विश्वस्त व कार्यकारिणी मंडळाच्या वतीने सचिव भरत ठोळे यांनी केले आहे.
कचनेर येथे पौर्णिमेनिमित्त आज विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:37 IST