शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे भारत' आता नांदेडहून धावणार, वेळ बदलल्याने छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:14 IST

वंदे भारतचा वेग आहे, वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरकरांचा आवाज कुणी ऐकतोय?

छत्रपती संभाजीनगर:वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे नांदेड, परभणीची प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. आता गाडी नांदेडहून पहाटे ५ वाजता निघणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. पूर्वी उपलब्ध असलेली सकाळची वेळ आता बदलल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या कार्यालयीन प्रवाशांचे नियोजन डगमगले आहे. विशेषतः सकाळच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराला दर्जेदार व वेळेत पोहोचणारी रेल्वे सेवा मिळणे गरजेचे आहे. पूर्वी वंदे भारत सकाळी सुमारे ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारपूर्वी पोहोचत असे. त्यामुळे अनेकांसाठी ती कार्यालयीन कामासाठी उपयुक्त ठरत होती. मात्र, आता नवीन वेळापत्रकाप्रमाणे ही रेल्वे नांदेड येथून पहाटे ५ वाजता सुटेल, परभणी ५. ४० वा., जालना ७. २० वा. तर छत्रपती संभाजीनगरात सकाळी ८. १३ वाजता येईल आणि मुंबई येथे दुपारी २. २५ वाजता पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासाच्या वेळेत बदल झाला नसून मुंबई येथून दुपारी १. १० वाजता निघून छत्रपती संभाजीनगरात सायंकाळी ७. ०५ वाजता पोहचेल. तर जालना ८ . ०५ वा. , परभणी ९. ४३ वा. येऊन नांदेड येथे पोहचण्याची वेळी १०. ५० वाजेची आहे. गाडी नांदेडहून येणार असल्याने तिचे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरील आगमन उशिरा होणार आहे. नवीन वेळ गैरसोयीची असल्यामुळे शहरातील प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. नवीन वेळापत्रक लवकरच लागू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रवाशांमध्ये संतापवंदे भारतसारखी जलदगती ट्रेन ही 'हब टु हब' कनेक्शनसाठी असते. मोठ्या शहरांना त्वरित जोडणारी सेवा सर्व प्रवाशांना फायद्याची ठरते. मात्र, नवीन वेळापत्रकामुळे वेळेत पोहोचणे हे मुख्य वैशिष्ट्य वंदे भारत एक्सप्रेसने गमावले आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. एवढ्या मोठ्या शहराला सुयोग्य वेळेची रेल्वे सुविधा मिळू नये हे दुर्दैवी आहे. राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्यामुळे या सेवेचा मूळ उद्देशच हरवत चालला असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.

सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करावीसंभाजीनगरहून मोठ्या प्रयत्नांनंतर मुंबईसाठी सकाळची गाडी मिळाली होती जी कार्यालयीन कामासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सोयीची होती. मराठवाड्यातील राजकारण्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांत आता ना धड जनशताब्दी ना वंदेभारत संभाजीनगरसाठी सोयीची ठरणार आहे. एकीकडे मोठे उद्योग शहरात येत असतांना चांगली सोयीची रेल्वेसेवा नसणे शहराच्या प्रतिमेसाठी चांगले नाही. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून शहरासाठी सोयीच्या वेळेत स्वतंत्र गाडी सुरू करून घ्यावी.-स्वानंद सोळंके, मराठवाडा रेल्वे कृती समिती

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसNandedनांदेडchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर