शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीच्या लाचखोर संचालकांची पुण्यात कोट्यवधींची माया; उच्चभ्रू वसाहतीमध्ये बंगले,बँकात लॉकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 17:28 IST

प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थान संस्थेचे(वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभू्र वसाहतीत कोट्यवधी रुपये किंमतीचे बंगले आणि बँकामध्ये लॉकर असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देदहा लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जल आणि भूमी व्यवस्थान संस्थेचे(वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडलेले दोघांचेही पुण्यातील उच्चभ्रू  वसाहतीत कोट्यवधी रुपये किंमतीचे बंगले आणि बँकामध्ये लॉकर असल्याचे समोर आले.

औरंगाबाद: प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थान संस्थेचे(वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभ्रू  वसाहतीत कोट्यवधी रुपये किंमतीचे बंगले आणि बँकामध्ये लॉकर असल्याचे समोर आले. त्यांच्या बंगल्याची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून  घेतली जाणार आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील म्हणाल्या की, वाल्मीचे महासंचालक आणि जलसंधारण आयुक्तालयाचे आयुक्त असे दोन पदे गोसावी सांभाळत होते. तर क्षीरसागर हे अधीक्षक अभियंता दर्जाचे अधिकारी असून ते सहसंचालकपदी कार्यरत आहेत. तक्रारदार हे त्यांच्या अधिपत्याखालील एका संस्थेत प्राध्यापक आहे. काही दिवसापूर्वी आरोपींनी त्यांना बोलावून घेत तुमची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाली असून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. तुम्हाला निलंबित करण्यात येणार आहे. निलंबनाची कारवाई न करण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया थांबविण्यासाठी आरोपींनी दहा लाखाची लाच मागितली. शुक्रवारी (दि,२९)वाल्मीतील कार्यालयात गोसावी यांनी क्षीरसागर यांच्यामार्फत लाचेच रक्कम तक्रारदाराकडून घेताना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले.

पुण्यात कोट्यावधींची संपत्ती या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपींच्या येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली. या घरझडतीत फारसे काही पोलिसांच्या हाती लागले नाही. गोसावी यांचे पुण्यातील शिवाजीनगर येथे तर क्षीरसागर यांचा सिंहगड सिटीमध्ये अलिशान बंगला असल्याचे चौकशीत समोर आले. या बंगल्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. शिवाय उभयतांची पुणे येथील बँकामध्ये लॉकर आहे. या लॉकरची तपासणी केली जाणार आहे.या लॉकरमध्ये काय मिळते, शिवाय त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. त्यांच्या खात्यातून किती रक्कमेचे व्यवहार झाले, याबाबतची पडताळणी केली जाणार आहे.