शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे घाटी रूग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:35 IST

घाटी रुग्णालयास औषधीटंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक औषधांच्या टंचाईमुळे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यांपासून गोरगरीब रुग्णांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयास औषधीटंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक औषधांच्या टंचाईमुळे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर आहे. अनेक महत्त्वाची औषधी उपलब्धच नाही. प्राथमिक स्वरूपाची औषधी आणि साहित्याचाही तुटवडा आहे. त्यामुळे दररोज बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागातील गोरगरीब रुणांचे हाल होत आहेत.घाटीत दररोज मराठवाड्यासह विदर्भ आणि लगतच्या भागातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये एकट्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज १,७०० ते २,००० रुग्णांवर उपचार होतात. यातील अनेकांना आंतररुग्ण विभागात दाखल केले जाते. घाटीत वर्षभर कोणत्या ना कोणत्या औषधांची टंचाई निर्माण होते; परंतु गेल्या पाच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागत आहे.औषधी खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच तिच्या खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ‘हाफकिन’ कंपनीकडूनच औषधी खरेदी होणार आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधी उपलब्ध होण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. घाटी रुग्णालयात जानेवारी महिन्यात झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत औषधी तुटवड्यावर चर्चा करण्यात आली. मात्र, चार महिन्यांनंतरही घाटीतील परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.रुग्णांचे नातेवाईक म्हणतात...घाटी परिसरातील औषधी दुकानातून औषधी आणि सलाईन खरेदी करणाऱ्या एका नातेवाईकाने म्हटले की, परिस्थितीमुळे मोठ्या आशेने रुग्णाला घाटीत दाखल केले. चांगले उपचार मिळाले; परंतु औषधी आणि सलाईनसाठी हातात चिठ्ठी देण्यात आली. पैशांची जुळवाजुळव करून औषधी आणि सलाईन खरेदी केली. त्यासाठी जवळपास एक हजार रुपये गेले....या औषधींचा तुटवडारुग्णालयात सलाईनची टंचाई सर्वाधिक आहे. आरएल, एनएस हे सलाईन्स उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. पॅरासिटामोलसारखे प्राथमिक औषधही उपलब्ध नाही. प्रतिजैविके नाहीत. शहरात दररोज दहा ते पंधरा जणांना मोकाट कुत्रे चावा घेत आहेत. तरीही अ‍ॅन्टिरेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) उपलब्ध होत नाही. मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींचा ठणठणाट आहे. कफ सिरपदेखील उपलब्ध नाही. बेटाडिनसारखे प्राथमिक वैद्यकीय साहित्य नसल्याने रुग्णालयात अडचणी निर्माण होत आहेत....पुढील आठवड्यात खरेदीहाफकिन कंपनीकडून गाईडलाईन मिळत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर औषधी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाह्यरुग्ण विभागात काही औषधींचा तुटवडा आहे. पुढील आठवड्यात औषधी खरेदी केली जाईल. रुग्णांची हेळसांड होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.-डॉ. कानन येळीकर,अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य