शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात बोंडअळीचे पंचनामे काही कार्यालयात, काही बांधावर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:06 IST

पंचनाम्याचे काम संपवण्यासाठी कृषि विभाग काही पंचनामे शेताच्या बांधावर व काही पंचनामे कार्यालयात बसून पूर्ण करत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

ठळक मुद्देपंचनाम्यासाठी १० दिवसांची डेडलाईन वैजापूर तालुक्यात अधिकारी, कर्मचार्‍यांची धावपळ

वैजापूर : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील जवळपास ७६ हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे जीपीएसद्वारे पंचनामे करुन हा अहवाल दहा दिवसात सादर करण्याचे आदेश कृषि विभागाला देण्यात आले आहेत. पण हे काम संपवण्यासाठी कृषि विभाग काही पंचनामे शेताच्या बांधावर व काही पंचनामे कार्यालयात बसून पूर्ण करत असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. हे पंचनामे करण्यासाठी शेतकर्‍यांनाच फोटो आणायला सांगितले जात आहे, हे विशेष.

बोंडअळीसंदर्भात तहसीलदार सुमन मोरे यांनी बैठक घेऊन ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक, सरपंच, पोलीस पाटील यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथके संपूर्ण तालुक्यात तैनात करण्यात आली आहेत. पण केवळ दहा दिवसात हे आव्हान पूर्ण करणे अशक्य वाटत असल्याने कृषि विभागाकडून काही पंचनामे शेताच्या बांधावर तर काही पंचनाम कार्यालयात बसून पूर्ण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कितपत खरे होतील, याबाबत साशंकता आहे. 

तालुक्यातील वैजापूर, खंडाळा, शिऊर, गारज, लासूरगाव, महालगाव, लोणी खुर्द, नागमठाण, बोरसर आणि लाडगाव या दहा महसूल मंडळातील ५९ तलाठी सज्जेअंतर्गत असलेल्या १६४ महसूली गावात पंचनामे करायचे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पंचनामे शेतकर्‍यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त शेतीचे जीपीस यंत्रणेद्वारे फोटो मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने काढण्यात यावेत, जेणेकरून नुकसानीच्या दाव्याची पडताळणी करता येईल. पण संबंधित कर्मचारी बांधावर न जाता शेतकर्‍यांनाच कार्यालयात बोलावून सरासरी ५० ते ६० टक्के क्षेत्रावर नुकसान झाल्याचे दाखवून पंचनामे पूर्ण करत असल्याचा आरोप आहे. 

मात्र, नुकसानीचे क्षेत्र जास्त असल्याने या कर्मचार्‍यांना एका दिवसात केवळ ३० ते ४० शेतकर्‍यांच्या बांधापर्यंतच पोहचणे शक्य होत आहे. आतापर्यंत १६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा तालुका कृषि अधिकारी विष्णू मोरे यांनी केला आहे. तालुक्यात एकूणच संपूर्ण कपाशीचे पीक बोंडअळी व किडीने पोखरले असून पंचनामे करणारी यंत्रणासुद्धा ही वस्तूस्थिती पाहून हादरली आहे.

कृषी सहायकाकडे पाच ते सहा गावांचा कारभारसंयुक्त पंचनामा करताना कृषी विभागाचा फिल्डवरील कर्मचारी असलेला कृषी सहायक महत्त्वाचा घटक आहे. परंतु तालुक्यात कृषी सहायकाकडे किमान पाच ते सहा गावांचा कारभार असून हजारो हेक्टर क्षेत्र आहे. तर एवढ्याच गावात तीन ते चार तलाठी व तेवढेच ग्रामसेवक आहेत. अशावेळी एकट्या कृषी सहायकाची सर्व ठिकाणी हजेरी लागणे अशक्य आहे. शिवाय काही ठिकाणी कृषी सहायकालाच पथकप्रमुख बनविण्यात आलेले आहे. येत्या दहा दिवसात हे पंचनामे पूर्ण करायचे असल्याने ग्रामीण भागात कर्मचार्‍यांकडून आता नवनवीन युक्त्या समोर येऊ लागल्या आहेत.  पंचनामे करताना हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी