लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कूलर निर्मितीच्या आड वीज ग्राहकांच्या मीटरमध्ये फेरफार करण्याचे काम करणाºया चिकलठाणा एमआयडीसीमधील कोहिनूर कंपनीवर गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी सायंकाळी धाड टाकून थ्री फेज आणि सिंगल फेजचे तब्बल २१ मीटर आणि सहा रिमोट असा सुमारे १ लाख १६० रुपयांचा ऐवज जप्त केला.चिनी रिमोटने वीजचोरी करणाºया २२ जणांना पकडल्यानंतर महावितरणने दाखल केलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आणि कर्मचारी करीत आहेत. या प्रकरणात अटकेत असणाºया आरोपींकडून कोहिनूर कारखान्यात वीज मीटरमध्ये फेरफार करण्याचे तसेच रिमोटद्वारे वीजचोरी करण्याचे प्रयोग केले जातात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोहेकाँ. शिवाजी झिने, रेखा चांदे, कर्मचारी विलास वाघ, गजानन मांटे, सुनील धात्रक, राजेंद्र चौधरी, देवचंद महेर, प्रभाकर राऊत यांनी या कारखान्यावर धाड मारली. तेव्हा तेथे अनेक ग्राहकांच्या मीटरमध्ये फेरफार केली जात असल्याचे आढळले. शिवाय काही मीटरवर टेस्टिंग असे लिहिण्यात आले होते. वीजचोरीचे रिमोट तेथे तयार केले जात असल्याचे आढळले. या कारखान्याचे मालक अश्फाक काझी (रा. कटकटगेट) आहे. ते सध्या बाहेरगावी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वीज मीटरमध्ये फेरफार; कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:56 IST