शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

देहविक्रीसाठी उझबेकिस्तान, दिल्लीच्या तरुणी छत्रपती संभाजीनगरात; कुख्यात रॅकेटचालक अटकेत

By सुमित डोळे | Updated: January 17, 2024 12:00 IST

प्राध्यापकानंतर देशभरात सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजपूत अटकेत; उझबेकिस्तानची एक, दिल्लीच्या दोन तरुणीची सुटका

छत्रपती संभाजीनगर : कॅसिनोत नोकरीच्या बहाण्याने उझबेकिस्तानची २८ वर्षीय तरुणी देशाच्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटमध्ये सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील टॉप महिला दलाल कल्याणीच्या माध्यमातून ती गेल्या ८ दिवसांपासून शहरात देहविक्री करत होती. बीड बायपास परिसरात बंगल्यात सुरू असलेल्या या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून ५ जणांना अटक केली. विदेशी तरुणीसह दिल्लीच्या २ तरुणींची सुटका केली.

सेक्स रॅकेटसाठी कुख्यात तुषार राजेंद्र राजपूत (४२) व प्रवीण बालाजी कुरकुटे (४३) यांच्यासह अन्य तिघांना यात अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. उच्चशिक्षित प्राध्यापक सुनील रामचंद्र तांबट (५४, रा. एन-७) याने स्वत:च्या ट्यूशनच्या तळमजल्यातच वेश्याव्यवसाय सुरू केल्याचे सिडको पोलिसांनी उघडकीस आणले. त्याचा साथीदार संदीप मोहन पवार (३२, रा. जाधववाडी) याच्यासह अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत बीड बायपासवर तुषारच्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटची माहिती पोलिसांना समजली होती. उपायुक्त नवनीत काँवत यांनी कारवाईच्या सूचना केल्या. निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता बीड बायपासवरील एका उच्चभ्रू वसाहतीतील बंगल्यावर डमी ग्राहक पाठवला. वेश्याव्यवसायाची खात्री होताच आत धाड टाकली. त्यानंतर तुषार, प्रवीणसह अन्य पाच जणांना अटक करण्यात आल्याचे काँवत यांनी सांगितले.

जूनपर्यंत टुरिस्ट व्हिजावर, १५ पेक्षा अधिक प्रवासाची तिकिटे२८ वर्षीय तरुणी मूळ उझबेकिस्तानची असून, विवाहित आहे. कॅसिनोमध्ये गलेगठ्ठ पगाराची नोकरी मिळाल्याचे सांगून ती ९ डिसेंबर रोजी दिल्लीत आली. १४ जून, २०२४ पर्यंत तिचा व्हिजिटर व्हिजा मंजूर आहे. दिल्लीत येताच ती सेक्स रॅकेटमध्ये सक्रिय झाली. एजंटच्या सांगण्यानुसार दिल्लीच्या २२ व ३० वर्षांच्या मुलींसह ती देशभरात विविध राज्यांमध्ये फिरली. आठ दिवसांपूर्वी पुण्यातील देह व्यापाऱ्यातील कुख्यात कल्याणीने तिघींना बोलावले होते. तुषारच्या मागणीनुसार कल्याणीने त्यांना कारने शहरात पाठवले. तिघींकडे प्रत्येकी १५ पेक्षा अधिक विमानाची तिकिटे आढळून आली.

२० वर्षांपासून एजंटभारतीय मुलींची ४ हजार तर विदेशी मुलींसाठी ८ ते १० हजार रुपयांमध्ये देहविक्री चालत होती. तुषारच्या मोबाइलमध्ये शहरातील अनेक नामवंत व्यावसायिक, राजकीय पुढाऱ्यांचे नाव आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले. तोच सर्व स्थानिक व्यवहार सांभाळत होता. तुषार, प्रवीणला शेवटचे १७ ऑक्टोबर २०२० रोजी बीड बायपासवर रॅकेट चालवताना अटक झाली होती. त्याच्यावर ६ तर प्रवीणवर ३ गुन्हे दाखल आहेत. गेल्या २० वर्षांपासून तुषार सेक्स रॅकेट चालवतो. देशभरातील एजंटसोबत त्याचा संपर्क आहे. मात्र, शहरातील सेक्स रॅकेटमध्ये पहिल्यांदाच पुण्याच्या कल्याणीचे नाव समाेर आले. कारागृहात राहूनही कल्याणी देशभरात सेक्स रॅकेट चालवण्यासाठी कुख्यात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी