शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरा; जिल्हा प्रशासनाचे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 18:08 IST

दुष्काळाच्या झळा : स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंत्राटदारांना काम देतानाच एसटीपीचे पाणी रस्ते बांधकामासाठी वापरण्याबाबत अट टाकून करार करावा, असेही प्रशासनाचे आदेश आहेत. 

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आदेश स्थानिक स्वराज्य संस्था कंत्राटदारांना करणार सूचना

औरंगाबाद : शहर व परिसरातील रस्ते बांधकामांच्या कामांसाठी महापालिकेच्या कांचनवाडी येथील एसटीपीचे (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) पाणी वापरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती पाहता प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी पिण्यासाठी प्राधान्याने वापरण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंत्राटदारांना काम देतानाच एसटीपीचे पाणी रस्ते बांधकामासाठी वापरण्याबाबत अट टाकून करार करावा, असेही प्रशासनाचे आदेश आहेत. 

शहरातील सांडपाण्यावर कांचनवाडी एसटीपी केंद्रात प्रक्रिया केली जाते. एसटीपीतून प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम, उद्यानांसाठी वापरण्यायोग्य आहे. जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू होईल, एनएच-२११ अंतर्गत औरंगाबाद ते धुळे महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे. समृद्धी महामार्गाचे व एनएच २११ चे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी मनपाशी करार करून एसटीपीचेच पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सोलापूर-धुळे महामागार्साठीही एसटीपीचे पाणी वापरण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

समृद्धी महामागार्चे काम तीन वर्षे चालेल. पुढील ७ वर्षे महामार्ग देखभाल व दुरुस्तीचे काम आणि वृक्षारोपण व संवर्धन कंत्राटदार करणार आहे. समृद्धी महामागार्साठी रोज १० एमएलडी पाणी लागणे अपेक्षित आहे. मनपातर्फे कमी दराने ते पाणी उपलब्ध होणे शक्य आहे. टँकरचा खर्च जास्त असल्याने समृद्धी महामार्ग कंत्राटदार एसटीपीवरून पाईपलाईन टाकून पाणी नेण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी एसटीपीतील पाणी वापरण्याबाबत बांधकाम व्यावसायिक संघटनांशी जिल्हा प्रशासनाची चर्चा सुरू आहे. 

१०९ कोटींचा एसटीपी भूमिगत गटार योजनेतून १०९ कोटींच्या खर्चातून कांचनवाडी येथे एसटीपी बांधण्यात आला आहे. तेथे १६१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असून, सध्या ६० एमएलडी पाणी तेथे मिळते. ते पाणी मनपादेखील त्यांच्या कामांसाठी वापरते की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे. तेथे पाणी उपलब्ध असल्याचे पालिकेने आजवर जाहीरदेखील केलेले ऐकिवात नाही. एसटीपीतील पाणी सध्या नाल्यात सोडून देण्यात येत आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सिमेंट काँक्रीट रस्ते, वृक्षारोपण व संवर्धन, गृहनिर्माण सोसायटी व अपार्टमेंटच्या बांधकामांसाठी एसटीपीतील पाणी वापरले जाण्याच्या दिशेने प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद