शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या जिद्दीमुळेच यूपीएससीत यश : आदित्य मिरखेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 18:57 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात  १५५ वा क्रमांक मिळविण्याची किमया औरंगाबादच्या आदित्य मिरखेलकर यांनी केली. त्यांच्याशी साधलेला संवाद... 

ठळक मुद्देदिलेले काम प्रामाणिकपणे करण्यास देणार प्राधान्य स्वच्छ अधिकाऱ्याचा नावलौकिक मिळवायचा आहे

- राम शिनगारे 

तुमचा शैक्षणिक प्रवास कसा आहे? औरंगाबाद महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात वडील पंपचालक, तर आई मनपा शाळेत प्राथमिक शिक्षिका. महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका पूर्ण केली. एमआयटीतून अभियांत्रिकीची पदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईतील ‘व्हीजेटीआय’मध्ये प्रवेश घेतला.  त्याठिकाणी शिक्षण घेत असताना ही छोटी फिल्ड आहे, आपण मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, असे वाटू लागले. यातूनच यूपीएससीची तयारी सुरू केली. 

परीक्षेची तयारी कशी केली? यूपीएससीचा अभ्यासक्रम अनेकवेळा वाचून घेतला. मागच्या वेळी प्रश्न कोणत्या प्रकारचे आले. त्यानुसार पूर्व परीक्षेचे प्रश्न सोडविण्याचा सराव केला. प्रत्येक विषयाची चांगली पुस्तके जमा केली. त्यानंतर परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नानुसार तयारी केली. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सर्वाधिक सराव केला. मुख्य परीक्षेसाठी सविस्तर उत्तरे लिहावी लागतात. तसे प्रश्न सोडविण्यासाठी मॅप, डायग्राम, फ्लो चार्ट आदींचा वापर केला.   

पहिल्या प्रयत्नात यश मिळाले का? नाही. २०१५ मध्ये पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात पूर्व परीक्षेत नापास झालो. २०१६ मध्ये पूर्व पास झालो; मात्र मुख्य नापास झालो. २०१७ मध्ये पूर्व, मुख्य उत्तीर्ण झालो. पण मुलाखतीत नापास झालो. २०१८ मध्ये या अनुभवाचा फायदा झाला. यातून मोठे बदल केले. व्यक्तिमत्त्व बदलले. त्यामुळे मुलाखतीत यश मिळवून देशात १५५ वा क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?आपल्याकडे विद्यार्थी फुल टाईमपास करतात. त्या विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. जी आवड आहे, त्यात छंद जोपासला पाहिजे. खेळ खेळावेत. यातून प्रखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे. सतत फिरून समाजाचा अनुभव धेतला पाहिजे. आवड जोपासावी. त्यातून चांगले करिअर घडविले पाहिजे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि चिकाटी असली पाहिजे.

परदेशी सेवांमध्ये काम करण्याची आवड आहे. या सेवेतून देशाच्या निर्णय प्रक्रियेत, धोरण निश्चितीमध्ये सहभागी होता येईल. ही सन्मानाची , अभिमानाची बाब आहे. - आदित्य मिरखेलकर

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद