शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Result 2021:वडिलांचे स्वप्न मुलीने साकारले;औरंगाबादच्या मानसीने पटकावली ६२७ वी रँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 16:37 IST

तिसऱ्या प्रयत्नात तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे चक्रव्यूह भेदत वडिलांचे स्वप्न साकार केले. 

औरंगाबाद: वडिलांचे यूपीएससी देऊन अधिकारी होण्याचे अपुरे स्वप्न अखेर मुलीने बाजी मारत साकारले आहे. औरंगाबादच्या मानसी सोनवणे हिने देशात ६२७ रँक मिळवत यूपीएससीचे उच्च शिखर काबीज केले. मानसीच्या वडिलांना खूप उशिरा या परीक्षेची माहिती मिळाली होती. त्यानंतरही त्यांनी एकदा मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. मात्र, वयोमर्यादेमुळे त्यांना पुन्हा परीक्षा देता आली नव्हती. ही खंत आता मुलीने दूर केल्याने घरात जल्लोषाचे वातावरण आहे.

मानसीची आई अर्चना आणि वडील नरेंद्र हे दोघे अधिकारी असल्याने घरात सुरुवातीपासून अभ्यासाचे वातावरण होते. नोकरीमुळे आई वडिलांच्या सतत बदली होत. यामुळे मानसीची दहावी आणि बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. याचदरम्यान औरंगाबाद या मुळगावी आईवडिलांची बदली झाली. त्यानंतर शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातून मानसीने बीए केले. 

पदवीचे शिक्षण घेत असतानाच केली तयारी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातून बीए करत असतानाच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मानसीने यूपीएससीची तयारी सुरु केली. तर वैकल्पिक विषयासाठी तिने दिल्ली गाठली. तिने खाजगी शिकवणी केल्यानंतर तिने सेल्फ स्टडीला प्राधान्य देत तयारी सुरु केली. तिसऱ्या प्रयत्नात तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे चक्रव्यूह भेदत वडिलांचे स्वप्न साकार केले. 

सातत्य हीच गुरुकिल्लीयूपीएससीच्या अभ्यासात सातत्य हीच गुरुकिल्ली आहे. तयारी करत असताना अनेकदा नैराश्य येऊ शकते. पण मानसिक कणखरपणा टिकवून ठेवल्यास यश आपलेच आहे. माझ्या यशाचे सर्वात जास्त श्रेय वडिलांना जाते. तसेच आई, बहिण सर्व नातेवाईकांनी मला कायम प्रोत्साहन दिले. - मानसी सोनवणे 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगAurangabadऔरंगाबाद