शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केवळ मनुष्यबळाअभावी सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील २१ आयसीयू बेड विनावापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 18:05 IST

घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी ५० आयसीयू बेडची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.

ठळक मुद्देतारेवरची कसरत करीत अखेर बेड रुग्णसेवेत प्रत्यक्षात २९ बेडच रुग्णसेवेत दाखल झाल्या;मनुष्यबळाअभावी २१ बेड रुग्णसेवेत दाखल करता आल्या नाहीत.

औरंगाबाद : शहरात आयसीयू बेड शिल्लक नसल्याने रुग्ण एकीकडे एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात भटकंती करीत होते, त्याच वेळी दुसरीकडे घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमधील ५० पैकी तब्बल २१ आयसीयू बेड केवळ मनुष्यबळाअभावी वापराविना होते. काही कर्मचाऱ्यांच्या जोरावर या खाटा गुरुवारी रुग्णसेवेत दाखल करण्यात आल्या; परंतु पुरेशा मनुष्यबळाअभावी तारेवरची कसरत घाटीला करावी लागणार आहे.

घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी ५० आयसीयू बेडची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्यक्षात यातील २९ बेडच रुग्णसेवेत दाखल झाल्या; परंतु केवळ मनुष्यबळाअभावी २१ बेड रुग्णसेवेत दाखल करता आल्या नाहीत. शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण चारपट झाले आहे. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आयसीयू बेडची गरज असताना एकाही रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नव्हते. घाटीत आयसीयू बेड उपलब्ध होते; परंतु मनुष्यबळच नसल्याने या खाटा रुग्णांसाठी वापरताच येत नव्हत्या. शहरातील वाढती रुग्णसंख्या, घाटीत रुग्णांचा वाढता ओघ, ही परिस्थिती पाहून २१ आयसीयू बेड गुरुवारी दुपारी रुग्णसेवेत दाखल करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. यासाठी ३० परिचारिका, पीजीची परीक्षा दिलेले काही डॉक्टर उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी कोरोनाच्या रुग्णांसाठी ७८ आयसीयू बेड होते. त्यांची संख्या आता २१ ने वाढेल, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले.

सुपर स्पेशालिटी ब्लॉकची परिस्थितीसुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये २१८खाटा या कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या २१८ खाटांसाठी किमान १०० चतुर्थश्रेणी कर्मचारी, १५० परिचारिका, ५० निवासी डॉक्टर पाहिजेत; परंतु आजघडीला केवळ ४५ चतुर्थश्रेणी कर्मचारी, ११० परिचारिका आणि ३६ निवासी डॉक्टर आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावरच कोरोनाच्या रुग्णांवर उपचाराची कसरत घाटी प्रशासनाला करावी लागत आहे.

घाटीत केवळ १५ ‘ओटू’, ८ ‘आयसीयू’ बेड शिल्लकघाटी रुग्णालयात गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ १५ आॅक्सिजन बेड आणि ८ आयसीयू बेड शिल्लक होते. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने घाटी रुग्णालय पूर्ण भरून गेले आहे. तरीही कोणत्याच रुग्णास खाट उपलब्ध नसल्याचे कारण सांगून परत पाठवू नये, अशी सक्त सूचना घाटी प्रशासनाने डॉक्टरांना केली आहे. घाटीत कोरोनाच्या रुग्णांसाठी ४५८ खाटा आहेत, तर ७८ आयसीयू बेड आहेत. यात १५ आॅक्सिजन बेड आणि ८ आयसीयू बेड रिकामे होते. रुग्णांचा ओघ पाहता रात्रीतून या खाटाही भरून जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली. घाटीत दुपारपर्यंत तब्बल २२४ रुग्ण गंभीर अवस्थेत होते. 

अपघात विभागातच रुग्णकोरोनाचे संशयित रुग्ण अपघात विभागात दाखल झाल्यानंतर याठिकाणी अँटिजन टेस्ट करून निदान केले जात आहे.  उपलब्ध खाटांची माहिती घेण्यात काहीसा वेळ जातो. त्यामुळे अनेक रुग्णांना येथून वॉर्डात दाखल होण्यास उशीर होतो.  रुग्ण अपघात विभागात थांबले तरी तेथे आॅक्सिजनची व्यवस्था असल्याने गैरसोय होत नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.  

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या