सतत असलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री वीज पुरवठा आल्यानंतर पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी साप-हिंस्त्र प्राणी आदींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. एक आठवडा दिवसा वीजपुरवठा केला जातो. मात्र नेमका त्याच वेळेला वीजपुरवठा खंडित होतो. ज्यावेळी दिवसा वीजपुरवठा केला जातो त्यावेळी दहा ते पंधरा वेळा विजेचा लपंडाव सुरु असतो. परिणामी पिकांना पाणी देता देता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येतात. दुसऱ्या आठवड्यात रात्रीला वीज पुरवठा होतो. त्यावेळी शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. यावेळी हिंस्र प्राणी व साप, विंचू आदी विषारी प्राण्यांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसा आणि तोही सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
अवेळी वीजपुरवठा, गल्लेबोरगाव शिवारातील शेतकरी त्रस्त
By | Updated: December 4, 2020 04:08 IST