शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

'गिरनेर तांडा'; औरंगाबादपासूनजवळ निसर्गाची मुक्त उधळण

By सुमेध उघडे | Updated: July 28, 2021 19:25 IST

Unseen Aurangabad : शहरापासून ७ ते ८ किलो मीटरच्या अंतरावर असलेल्या गिरनेर तांडा येथे हा नजारा पर्यटकांची वाट पाहत आहे.

पावसाचे धमाकेदार आगमन झाल्यानंतर पर्यटनस्थळांनी आपले रुपडे बदले आहे. हिरवेगार झालेले डोंगर आणि कोसळणारे धबधबे साऱ्यांना खुणावत आहेत. विशेष म्हणजे, औरंगाबादकरांना हे आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी कुठे दूर जाण्याचीही गरज नाही. होय, शहरापासून ७ ते ८ किलो मीटरच्या अंतरावर असलेल्या गिरनेर तांडा येथे हा नजारा पर्यटकांची वाट पाहत आहे. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथून अवघ्या ४ किलो मीटरवर डोंगरात गिरनेर तांडा आहे. नेहमीच्या पर्यटनस्थळासारखी इथे गर्दी नसल्याने मन हरवून जाते. येथील हिरवाईने नटलेल्या डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहून मिळणारा आनंद अवर्णीय ठरतो. मात्र, कोरोना नियमांचे पालन करूनच हा आनंद घ्या. 

कसे जाल - औरंगाबाद ते पैठण रोडवर ४ किलोमीटरवर गेवराई तांडा आहे. या तांड्यापासून आतमध्ये ४ किमी गेल्यास गिरनेर तांडा लागतो. विशेष म्हणजे शहरापासून थेट गिरनेर तांड्यापर्यंत रस्ता चांगला आहे. यामुळे अगदी मोपेडवर सुद्धा जाता येईल. 

काय पहाल - गिरनेर तांड्यावर गेल्यास एक छोटीसी वस्ती नजरेस पडेल. या वस्तीपासून काही अंतरावरच एक मारुती मंदिर आहे. मागे डोंगर रांगा असून एक तलावही आहे. डोंगरावरून कोसळणारे धबधबे खास आकर्षण ठरतात. चढाईस सोपे डोंगर, स्वच्छ हवा, नितळ पाण्याचे वाहते झरे हे येथील वैशिट्य. तसेच हा भाग नेहमीच्या पर्यटनस्थळांच्या यादीतील नाही. यामुळे येथे काही मोजकीच पर्यटक भेट देतात. शांत वातावरणात निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर येथे एकदा नक्की भेट द्या.  ( फोटो : इंस्टाग्राम - पराग सरवदे )

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन