शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

शिवजयंतीचा अभूतपूर्व जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:04 IST

‘प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंधर, ‘क्षत्रिय कुलावतंस्, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, ‘महाराज’, ‘श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’... असा गगनभेदी जयघोष करीत औरंगाबादकरांनी राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंधर, ‘क्षत्रिय कुलावतंस्, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, ‘महाराज’, ‘श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’... असा गगनभेदी जयघोष करीत औरंगाबादकरांनी राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा केला. ‘जयभवानी, जय शिवाजी’ नामोच्चाराने निर्माण झालेले ‘शिवमय’ चैतन्य अनुभवले. पहाटेपासूनच क्रांतीचौकात ‘शिवरायांच्या’ अश्वारूढ पुतळ्याभोवती तरुणाई एकवटली होती. शक्ती-भक्तीचा अभूतपूर्व सोहळा अनेकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.शहरात शिवजयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. क्रांतीचौकात तरुणाईचा सागर उसळला होता. याशिवाय शहरात सर्वत्र उदंड उत्साह संचारला होता. टीव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध संघटनांतर्फे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत होते. सिडको एन-७ येथील आविष्कार कॉलनी, मुकुंदवाडी, जयभवानीनगर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातही सकाळपासूनच उत्साही वातावरण होते.विविध भागांतून तरुणांनी उत्स्फूर्तपणे दुचाकी रॅली काढली. प्रत्येक दुचाकीवर भगवा ध्वज लावलेला होता. दुचाकी रॅलीत तरुणीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अनेक तरुणी नऊवारी साडी व डोक्यावर भगवा फेटा बांधून दुचाकी चालवत होत्या. सर्वत्र ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष घुमत होता. कॉलन्या-कॉलन्यांमध्ये शिवजयंतीनिमित्त व्याख्याने, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगीते वाजविली जात होती. मुख्य मिरवणूक सायंकाळी निघाली; पण अनेक उत्साही तरुणांनी सकाळपासूनच वाहनांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पुतळा ठेवून आपापल्या भागातून मिरवणुका काढल्या. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू क्रांतीचौक होते. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जात होते. टीव्ही सेंटर परिसरात महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले. तरुणच नव्हे, तर शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सायकल रॅली काढली. लहान-मोठे भगवे झेंडे सायकलच्या हँडलला लावले होते. संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण पसरले होते.राजाबाजारातून मुख्य मिरवणूकशिवजयंतीनिमित्त जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने राजाबाजार येथून निघालेल्या मुख्य मिरवणुकीत सजीव देखाव्यांनी लक्ष वेधले. शहराचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरापासून सायंकाळी ढोलताशाच्या गजरात मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रारंभी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, महापौर नंदकुमार घोडेले, आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी आ. संजय शिरसाट, मा. खा. प्रदीप जैस्वाल, माजी आ. कल्याण काळे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव तसेच महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रकाश मुगदिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, ज्येष्ठ नेते व माजी महापौर रशीदमामू, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष इब्राहिम पठाण, सय्यद अक्रम, सुरेश टाक, विनोद कोहळेकर तसेच नवीनसिंग ओबेरॉय, अ‍ॅड. चंद्रकांत ठोंबरे, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, तनसुख झांबड आदींची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करीत शिवजयंती यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ‘पुढील शिवजयंतीपूर्वी क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढविण्यात येईल,’ असे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. यानंतर महोत्सव समितीच्या सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला व मिरवणुकीला सुरुवात झाली. युवकांनी ढोल-ताशाचा गजर करीत सर्व परिसर दणाणून सोडला. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले ते सजीव देखावे. शिवछत्रपती महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक’ सजीव देखावा सादर करण्यात आला. यातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने शेतक-यांच्या प्रश्नावर सजीव देखावा सादर करण्यात आला. ‘शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी कसे सुखी होते’ याचे एक दृश्य व ‘सध्याच्या परिस्थितीत शेतक-यांची झालेली दैन्यावस्था’ अशा पद्धतीने दोन काळातील तुलना करण्यात आली होती. यशस्वीतेसाठी अभिजित देशमुख, अनिल मानकापे, रवींद्र काळे, संदीप शेळके, शिवाजी दांडगे, राजू वानखेडे, बाळू औताडे, सुनील मगरे, विश्वास औताडे, मनोज पाटील, रमेश गायकवाड, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, अप्पासाहेब कुढेकर, रमेश केरे, मनोज गायके, हरीश शिंदे, दिग्विजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.