शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; तरुणाईच्या जल्लोषाने परिसर गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 15:54 IST

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सव-२०१८ ला आज सकाळी जल्लोषात सुरुवात झाली.

औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सव-२०१८ ला आज सकाळी जल्लोषात सुरुवात झाली. प्रवेशद्वार ते मुख्य रंगमंचापर्यंत शोभायात्रेने सुरुवात झालेल्या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सुबोध भावे, माजी विद्यार्थी व अभिनेते उमेश जगताप यांच्या झाले. 

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, नलिनी चोपडे,  परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान, संयोजन समिती सदस्य डॉ. दासू वैद्य, प्रा. संभाजी भोसले, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय नवले, डॉ. संजय पाटील, डॉ. सुधाकर शेंडगे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, अधिसभा आणि अधिष्ठातांची उपस्थित होती. 

युवा महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी प्रवेशद्वार ते मुख्य रंगमंचापर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध महाविद्यालयांनी सहभागी होत सामाजिक संदेश दिला. उद्घाटनानंतर सुबोध भावे व उमेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. प्रस्ताविक आणि आभार संचालक डॉ. मुस्तजिब खान यांनी मानले. कार्यक्रमाला कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्तअभाविप आणि आंबेडकरी संघटनांमध्ये कुलगुरू दालनात झालेल्या राड्यामुळे आंबेडकरी संघटनांनी युवा महोत्सव उधळून लावण्याचा इशारा दिला होता. यामुळे उद्घाटन स्थळी बंदुकधारी फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. गोंधळ घालणारांना पायबंद घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज होती.  यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचवेळी आंबेडकरी विद्यार्थीं संघटनांनी पत्रक काढून विद्यार्थी हितासाठी युवा महोत्सव उधळून लावण्याचा निर्णय मागे घेतल्याचे कळविले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय