शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कार्यमुक्त न होता प्रशासनालाच जाब विचारला; विद्यापीठाने बदली आदेश धुडकावणाऱ्या कक्ष अधिकाऱ्याचे वेतन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:40 IST

वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.

ठळक मुद्देपरीक्षा विभागातील कक्ष अधिकारी पोपट निकम हे मात्र कार्यमुक्त झाले नाहीत.नोटिसीच्या पाठीमागे लिहून आपली बदली करण्याचे कारण काय, असा प्रशासनाला प्रश्न विचारला.

औरंगाबाद : बदली झाल्यानंतर कार्यमुक्त न होता ठाण मांडलेल्या परीक्षा विभागातील कक्ष अधिकाऱ्याविरुद्ध वेतन रोखण्याची कारवाई विद्यापीठ प्रशासनाने केली आहे.

वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.  कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर कुलगुरूंनी कोणत्या विभागात कोणता कर्मचारी व तो कधीपासून काम करतो, याबाबतची माहिती जाणून घेतली.  कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी १९ ऑक्टोबर रोजी २१ स्थायी व १० रोजंदारीवरील कर्मचारी, अशा ३१ कर्मचाऱ्यांचे बदली आदेश निर्गमित केले. दरम्यान, ३० ऑक्टोबरपूर्वी जवळपास बदली झालेले सर्वच कर्मचारी व अधिकारी कार्यमुक्त झाले व बदलीच्या विभागात रूजूही झाले.

परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी पोपट निकम हे मात्र कार्यमुक्त झाले नाहीत. ते आहेत त्याच ठिकाणी सेवा बजावत होते. यासंदर्भात कुलसचिव डॉ. सूर्यवंशी यांनी निकम यांना कार्यमुक्त होण्याबाबत सुरूवातीला तोंडी सूचना दिल्या. तरीही ते कार्यमुक्त झाले नाहीत. त्यानंतर त्यांना कारणे दर्शक नोटीस बजावली. नोटीसला उत्तर द्यायच्याऐवजी निकम यांनी त्या  नोटिसीच्या पाठीमागे लिहून आपली बदली करण्याचे कारण काय, असा प्रशासनाला प्रश्न विचारला. प्रशासनाने त्यांंना एकतर्फी कार्यमुक्त केले व त्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश  दिले. 

६ कक्ष अधिकाऱ्यांच्या झाल्या होत्या बदल्याकक्ष अधिकारी पोपट निकम यांच्यासह सहा कक्ष अधिकाऱ्यांच्या विविध विभागांत बदल्या करण्यात आल्या.  यामध्ये निकम यांची परीक्षा विभागातून राष्ट्रीय सेवा विभागात, कक्ष अधिकारी बी. एन. फड यांची परीक्षा विभागातून कुलसचिव कार्यालय, कक्ष अधिकारी ए.ए.वडोदकर यांची प्र- कुलगुरू कार्यालयातून सांख्यिकी विभागात, कक्ष अधिकारी जी. जी. खरात यांची आस्थापना विभागातून लेखा विभागात, कक्ष अधिकारी वाय. एस. शिंदे यांची लेखा विभागातून आस्थापना विभागात, कक्ष अधिकारी डॉ. ए.यू. पाटील यांची सांख्यिकी विभागातून पीएच.डी. विभागात बदली करण्यात आली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादTransferबदलीEducationशिक्षण