शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:55 IST

वारंवार परीक्षा संचालक बदलण्याचा फटका

ठळक मुद्देआता १० एप्रिलला सुरू होणार परीक्षापुनर्मूल्यांकनासाठी दाखल उत्तरपत्रिकांचा निकाल नाही

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ५ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी दाखल केलेल्या उत्तरपत्रिकांचा निकाल जाहीर केलेला नसल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की दुसऱ्यांदा ओढावली आहे. सुधारित नियोजनानुसार १० एप्रिलपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षा २२ मार्चवरून २८ आणि २८ मार्चवरून ५ एप्रिलपर्यंत लांबविण्यात आल्या होत्या. पदवीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार २८ मार्चपासून सुरूझाल्या आहेत. मात्र सतत परीक्षा संचालक बदलणे, नवनियुक्त परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांना परीक्षेच्या नियोजनासाठी मिळालेला अल्प कालावधी, निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्तीवर गेलेले कर्मचारी, पूर्वीच्या परीक्षांचे रखडलेले निकाल, पुनर्मूल्यांकनाचा अद्यापही जाहीर न झालेला निकाल, यामुळे पदव्युत्तर परीक्षाचे नियोजन कोलमडले आहे. पदव्युत्तर परीक्षेची केवळ परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. पेपर सेटिंग, हॉल तिकीट वितरण आदी कामे अर्धवट असून, त्यासाठी थोडा अवधी लागणार असल्याचे परीक्षा संचालक डॉ. मंझा यांंनी परीक्षा मंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर पदव्युत्तरच्या परीक्षा ५ एप्रिलऐवजी १० एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीला परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा, सदस्य डॉ. गोविंद काळे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. मझहर फारुकी, डॉ. मुळे यांची उपस्थिती होती. सीईटीद्वारे प्रवेश मिळालेल्या परीक्षा २५ पासूनपदव्युत्तर अभ्यासक्रम असलेल्या एम. ए., एम. कॉम., एम.एस्सी. या महाविद्यालयीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १० एप्रिलपासून  सुरू होणार आहेत. मात्र शासनाच्या सीईटीद्वारे प्रवेश देण्यात येत असलेल्या बी. एड., एम. एड., बी.पीएड., एम.पीएड. आणि विधि अभ्यासक्रमांच्या परीक्षा २५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमांचा अध्यापन कालावधी ९० दिवस पूर्ण होत नसल्यामुळे परीक्षा लांबविण्यात आल्या आहेत. त्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे................... 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थी