श्री श्री १००८ महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ४ ते ६ काकडा, ९ ते ११ प्रकाश सुदाम जोशी (मध्यप्रदेश) यांच्या रसाळ वाणीतून गुरुचरित्र व नवनाथ पारायण वाचन होईल. सकाळी ११ ते दुपारी ४ कथा प्रवक्ते ह.भ.प पारस महाराज जैन, बनोटी हे भागवत कथा वाचन करतील. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरी कीर्तन व नंतर जागर होईल. कीर्तन सोहळ्यात बुधवारी बाल कीर्तनकार अयोध्या सुलताने लोणवाडीकर यांचे कीर्तन होईल. गुरुवारी साईनाथ महाराज आळंदी, शुक्रवारी सागर महाराज काचोळे जवखेडा, शनिवारी समाज प्रबोधनकार संतोष महाराज आढवणे-पाटील कुंभारी, रविवारी ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर, सोमवारी सारंगधर महाराज जवळा, मंगळवारी सुदाम महाराज पानेगावकर यांचे तर, ३० डिसेंबर रोजी आदिनाथ महाराज दानवे आष्टी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
शेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:05 IST