शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात वाघाने दिली वर्दी; दोन बछड्यांसह वाघीणीने घेतली ज्वारीच्या शेतात निद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 13:59 IST

Tiger In Aurangabad District सोयगाव तालुक्यातील घोसला शिवाराला लागूनच असलेल्या डोंगररांगांतून सदर वाघीण बछड्यांसह शेतशिवारात आल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्याने मोबाइलद्वारे घेतले छायाचित्र; याबाबत वनविभाग अंधारात

- ज्ञानेश्वर वाघ

घोसला : मराठवाडा विभागातील जंगलात वाघ नाहीत, वर्षभरापूर्वी केवळ एक वाघ विदर्भातून फिरत आल्याची घटना घडली होती. मात्र, गुरुवारी पहाटेच्या सुमारास सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात एक वाघीण आपल्या दोन बछड्यांसह दिसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून, आपल्या मोबाइलमध्ये तिचे छायाचित्रही टिपले आहे. या छायाचित्रातील आकार व पट्ट्यांमुळे ती मादी बिबट्या नसून वाघीण असल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली. ग्रामस्थ गुरुवारी दिवसभर भीतीच्या सावटाखाली होते.

घोसला शिवाराला लागूनच असलेल्या डोंगररांगांतून सदर वाघीण बछड्यांसह शेतशिवारात आल्याचे बोलले जात आहे. गट क्र. १०८ जवळील शेतात शेतकरी सुपडू पटेल यांना एका रोहीची शिकार केल्याचे आढळून आले. तीन ते चार दिवसांपूर्वी ही शिकार केली असावी, असा अंदाज आहे. गुरुवारी पहाटे ६ वाजता शेतावर जाणाऱ्या प्रकाश एकनाथ गव्हांडे यांनी वाघिणीला बछड्यांसह प्रत्यक्ष एका ज्वारीच्या शेताकडे जाताना पाहिले. यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली. यावेळी बॅटरीच्या प्रकाशझोतात त्यांनी त्यांचे माेबाइलद्वारे छायाचित्र घेतले व तेथून गावाकडे धूम ठोकली. 

ही वाघीण बापू वाघ यांच्या ज्वारीच्या शेतात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बापू वाघ यांनी खळ्यावरील एका खोलीत टेपरेकॉर्डर मोठ्याने वाजवून आरोळ्या ठोकल्या. या आवाजानंतर सदर वाघिणीने डरकाळी फोडल्यानंतर बापू वाघ हे दुचाकी घेऊन घराकडे पळाले. यानंतर वाघिणीने या ज्वारीच्या शेतात बछड्यांसह गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निद्रा घेतल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत वनविभागाशी संपर्क केला असता, वनपाल अनिल पाटील यांचा मोबाइल बंद येत होता, तर वनपरिक्षेत्र अधिकारी हे बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे या घटनेबाबत वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत.

डरकाळी फोडल्यानंतर तेथून निघालोज्वारीच्या शेतात वाघीण बछड्यांसह आल्याची माहिती मिळाली. शेतावर जाऊन मी टेपरेकॉर्डर मोठ्याने वाजवून आरोळ्या ठोकल्या. मात्र, वाघिणीने डरकाळी फोडल्यानंतर मी तेथून घराकडे आलो.-बापू वाघ, शेतकरी, घोसला

जवळूनच बछड्यांसह वाघीण दिसलीपहाटे ६ वाजता शेतावर जात असतानाच अचानक रस्त्यावर जवळूनच बछड्यांसह वाघीण जाताना दिसली. बॅटरीच्या प्रकाश झोतात ते थोडे चलबिचल झाले व शेजारच्या शेतात गेले. मी मोबाइलमध्ये त्यांचे छायाचित्र टिपले. याबाबत मी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली.-प्रकाश एकनाथ गव्हांडे, शेतकरी, घोसला

टॅग्स :forest departmentवनविभागTigerवाघAurangabadऔरंगाबाद