लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सर्दी - खोकल्याच्या आजारापासून बरे होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांमधून नशा करणाऱ्या सहा जणांना शहर पोलिसांनी शनिवारी रात्री किल्ला मैदान भागात पकडले. त्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.फॅन्सीडिल आणि कोरेक्स या औषधांमधून नशा करण्याचे प्रमाण वाढले आहे. तरूण वर्ग याला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहे. शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी अशा नशेखोरांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली. किल्ला मैदान परिसरात रात्रीच्या वेळी औषधातून नशा करणाऱ्या सहा जणांना पकडून ठाण्याची हवा दाखविली.सय्यद महेबूब सय्यद युसूफ, नय्यर रहेमान खान, समशेर खान शेर खान, सय्यद रहेमान युसूफ, शेख जावे इस्माईल, अन्वर खान जाहेर खान अशी त्या तरूणांची नावे आहेत. त्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामुळे नशेखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.औषधी विक्रेत्यांना नोटीसडॉक्टरांच्या प्रिसक्रिप्शनशिवाय औषधी देणे नियमबाह्य आहे. मात्र, शहरात विक्रेते प्रिसक्रिप्शनशिवाय औषधी विक्री करतात. त्यामुळे औषध प्रशासनाला पत्र पाठवून या संदर्भात उचित कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. औषध विक्रेत्यांना नोटीस देखील बजावण्यात येणार असल्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी सांगितले.
सहा नशेखोर पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: May 21, 2017 23:51 IST