शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या काका, मामाला १० वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:38 IST

Rape On Minor घटना उघडकीस आणलेल्या शिक्षिकेसह सहशिक्षिका आणि पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.

ठळक मुद्देमावशीलाही तीन महिन्यांचा कारावासपॉक्सो कायद्यातहत सुनावली शिक्षा

औरंगाबाद : सहावीत शिकणाऱ्या मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली मुलीच्या मावशीचा पती (काका) आणि नात्याने चुलत मामा असलेल्या आरोपींना विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी गुरुवारी (दि.१५) प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास तसेच पीडितेच्या मावशीला तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. आरोप सिद्ध होण्यासाठी घटना उघडकीस आणलेल्या शिक्षिकेसह सहशिक्षिका आणि पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.

७ सप्टेंबर २०१७ रोजी पीडिता शाळेत गेल्यानंतर रडत असल्यामुळे शिक्षिकेने चौकशी केली असता मुलीने सांगितले की, आई-वडील नसल्यामुळे ती मावशीकडे राहते. तिला घरातील सर्व कामे करावी लागतात. न केल्यास घराबाहेर काढण्याची धमकी दिली जाते. तिला रात्री शौचालयात झोपवतात. घटनेच्या रात्री शौचालयात झोपलेली असताना मावशीचा पती आणि चुलत मामा यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. याबाबत कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. मावशीला सांगितले तर काम जड झाले म्हणून खोटे आरोप करतेस, असे ती म्हणाली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्षिकेने सहशिक्षिकेला सोबत घेऊन मुख्याध्यापक आणि स्थानिक नगरसेवकांच्या कानावर घटना टाकली. शिक्षिकेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले.

पॉक्सो कायद्यातहत सुनावली शिक्षान्यायालयाने दोन्ही पुरुष आरोपींना बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) चे कलम ४ आणि ६ नुसार प्रत्येकी १० वर्षे आणि कलम ८ खाली प्रत्येकी ४ वर्षे सश्रम कारावास तसेच भादंवि कलम ५०६ खाली दोघांनाही प्रत्येकी एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पीडितेच्या मावशीला भादंवि कलम ५०६ खाली ३ महिन्यांचा कारावास सुनावला. अ‍ॅड. अविनाश कोकाटे यांनी सरकार पक्षाला साहाय्य केले.