शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनचालकांनो सावधान; दंडाच्या नोटिसा पोहोचणार पोस्टाद्वारे घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:00 IST

सावधान... बेशिस्त वाहनचालकांनो, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच पोलीस आता त्यांच्या मोबाईल आणि हॅण्डी कॅमेऱ्यांद्वारे तुमचे छायाचित्र काढत आहेत.

ठळक मुद्दे तुमच्या घरच्या पत्त्यावर छायाचित्रासह घरपोच दंडाची नोटीस प्राप्त होणार आहे. पोलिसांनी नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे.

औरंगाबाद : सावधान... बेशिस्त वाहनचालकांनो, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच पोलीस आता त्यांच्या मोबाईल आणि हॅण्डी कॅमेऱ्यांद्वारे तुमचे छायाचित्र काढत आहेत. एवढेच नव्हे, तर तुमच्या घरच्या पत्त्यावर छायाचित्रासह घरपोच दंडाची नोटीस प्राप्त होणार आहे. पोलिसांनी नुकताच हा उपक्रम सुरू केला आहे. एवढेच नव्हे, तर पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न कराल, तर त्याचेही छायाचित्रण पोलिसांच्या शरीरावरील कॅमेऱ्याद्वारे केले जात आहे. 

पंधरा लाखांची लोकसंख्या असलेल्या शहरातील वाहनांची संख्याही आता अकरा ते बारा लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ म्हणावे तसे वाढले नाही. शहरात सध्या सिडको, शहर विभाग क्रमांक १ आणि २, छावणी आणि वाळूज, अशा पाच वाहतूक शाखा कार्यरत आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, सहायक आयुक्त एच.एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांसह सुमारे साडेतीनशे कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. असे असले तरी केवळ ७५ टक्केच कर्मचारी कर्तव्यावर हजर असतात.

रजा, साप्ताहिक सुटीसह अन्य कार्यालयीन कामकाजामध्ये उर्वरित कर्मचारी असतात. प्रत्येक चौका-चौकातील वाहतूक सिग्नलवर वाहतूक नियमन करण्यासोबतच नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई पोलीस करीत असतात; मात्र एकाचवेळी अनेक वाहनचालकांनी नियम तोडला, तर एक हवालदार एकावेळी एका जणावरच कारवाई करू शकतो, अशावेळी अन्य बेशिस्त वाहनचालक संधी साधून तेथून पळून जातात. असा हा नित्याचाच अनुभव वाहतूक पोलिसांना येतो. ही बाब लक्षात घेऊन सिडको वाहतूक विभागाचे निरीक्षक हेमंत गिरमे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने बेशिस्त वाहनचालकांचे मोबाईलवर छायाचित्र काढा, असे आदेश दिले. त्यानुसार आता कारवाई सुरू झाली आहे. गिरमे यांनी शनिवारी हर्सूल टी पॉर्इंटसह विविध ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांचे त्यांच्या मोबाईलवर छायचित्रे काढली . 

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई गरजेचीयाविषयी बोलताना पोलीस निरीक्षक गिरमे म्हणाले की, बेशिस्त वाहनचालक सिग्नलवर थांबत नाही, स्टॉप लाईन पाळत नाही, कार चालविताना सीट बेल्ट न लावणे, विना हेल्मेट दुचाकी चालवितात. हे पोलिसांना दिसते; मात्र एकाचवेळी त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना शक्य होत नाही. म्हणून त्यांचे छायाचित्र काढून त्यांना आता पोस्टाद्वारे घरपोच नोटिसा पाठविण्यास सुरुवात झाली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी