शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

मंजूर न झालेला ठराव इतिवृत्तात घुसडला; विद्यापीठ क्रीडा विभागातील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:11 IST

प्रशिक्षकांना त्रास देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाचा दुरुपयोग?

- राम शिनगारे 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव केला उस्मानाबाद उपकेंद्रात ‘स्पोर्टस् अ‍ॅक्टिव्हिटी’ वाढविण्याचा; परंतु या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाने बोलावलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात चक्क दुसराच विषय घुसडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्या इतिवृत्तात व्यवस्थापन परिषदेच्या नावावर तिसराच ठराव दाखवून इतिवृत्तालाही व्यवस्थापन परिषदेची मंजुरी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. ही कागदपत्रेच ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या हाती लागली आहेत.

विद्यापीठात शारीरिक शिक्षणशास्त्र आणि क्रीडा विभाग आहे. क्रीडा विभागांतर्गत संलग्न महाविद्यालयांतील क्रीडा विभागाच्या सहकार्याने स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या विभागाचा संचालक मागील अनेक वर्षांपासून संलग्न महाविद्यालयातील होता. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे विद्यापीठातील विविध विभागांचे पदभार काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या विभागाचा पदभार शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना झरीकर यांच्याकडे सोपविण्यात आला. 

दि. ७ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सदस्य संजय निंबाळकर यांनी उपकेंद्रात ‘स्पोर्टस् अ‍ॅक्टिव्हिटी’ वाढविण्याचा ठराव मांडला होता. हा एक ओळीचा ठराव बैठकीत मंजूर झाला. यानंतर क्रीडा व  शारीरिक शिक्षण मंडळाची दि.१६ नोव्हेंबर २०१९ रोजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत एकूण १२ विषय चर्चेसाठी ठेवले होते.  त्यात ‘स्पोर्टस् अ‍ॅक्टिव्हिटी’च्या ठरावाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने १२ व्या क्रमांकावर ‘उस्मानाबाद येथील उपकेंद्रात क्रीडा विभाग व एम.पी.एड. अभ्यासक्रम सुरू करणे’ हा विषय होता. या बैठकीचे इतिवृत्त २८ नोव्हेंबरला तयार झाले. या इतिवृत्तात ७ सप्टेंबरच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ‘क्रीडा विभागातील मार्गदर्शकांना उपकेंद्रात क्रीडा विभागाचा विकास करण्यासाठी साखळी पद्धतीने ३ महिने किंवा ६ महिन्यांनी पाठविण्याचे ठरले आहे’, असा निर्णय झाल्याचे नमूद आहे. बदलीची चर्चा शिक्षण मंडळाच्या बैठकीत झालेली नाही, असे सदस्य डॉ. उदय डोंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. व्यवस्थापन परिषदेच्या ठरावात छेडछाड व क्रीडा मंडळात न झालेली चर्चा इतिवृत्तामध्ये समाविष्ट केली कुणी?  या इतिवृत्ताला व्यवस्थापन परिषदेनेही नुकत्याच झालेल्या बैठकीत डोळे झाकून मंजुरी  दिली.

उपकेंद्रात क्रीडा विभागच नाहीविद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागच अस्तित्वात नाही. त्यामुळे विद्यार्थी नसताना विद्यापीठाच्या विभागातील मार्गदर्शकांच्या बदल्या त्याठिकाणी करण्याचे इतिवृत्तात का दाखविले आहे. विद्यापीठात पाच विभाग अस्तित्वात आहेत. ते बंद करून मार्गदर्शकांना त्रास देण्यासाठी हा प्रयत्न सुरूअसल्याचे स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादProfessorप्राध्यापकAurangabadऔरंगाबाद