शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

उकाड्यामुळे दार उघडे ठेऊन झोपले; चोरट्यांनी घरात घुसून सोन्याची पोत आणि रोकड पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 15:55 IST

चोरांचे धाडस वाढले असून उघड्या दारातून घरात घुसण्याच्या घटना वाढत आहेत 

ठळक मुद्देहनुमाननगरात उघड्या घरातून पळविली सोन्याची पोत आणि रोकडयाविषयी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबाद : चार दिवसांपूर्वी हनुमाननगरातील घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना ताजी असतानाच १८ मेच्या रात्री अन्य एका महिलेच्या उघड्या घरातून चोरट्यांनी ८ ग्रॅमची सोन्याची पोत आणि ३० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आशाबाई शंकर हाळनोर (५०) या त्यांची मुलगी दीपालीसह हनुमाननगर येथे राहतात. सोमवारी रात्री त्यांनी घराच्या गेटला कुलूप लावले आणि घराचे दार उघडे ठेवून दीपालीसह त्या झोपल्या. तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या उशाला गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याची पोत ठेवली. यासोबतच त्यांनी घरात पर्समध्ये रोख ३० हजार रुपये ठेवले होते. मध्यरात्रीनंतर २.४५ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांच्या उशाखाली ठेवलेली सोन्याची पोत आणि पर्समधील ३० हजारांची रोकड चोरून नेली. चोर घरातून पळून जात असल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. या घटनेची माहिती त्यांनी लगेच पोलिसांना कळविली. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हाळनोर यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार एल. बी. हिंगे तपास करीत आहेत.

उघड्या घरातून ऐवज पळविण्याच्या घटना वाढल्याउन्हाळ्यात उकाडा असह्य होत असल्यामुळे लोक रात्री घराचे दार उघडे ठेवून झोपतात. ही संधी साधून चोरटे उघड्या घराला लक्ष्य बनवित आहेत. २७ एप्रिल रोजी सिडकोतील एका घरातून चोरट्यांनी ८ तोळ्यांचे दागिने लंपास केले. याविषयी सिडको ठाण्यात नोंद आहे. या गुन्ह्याचा उलगडा अद्याप झाला नाही. मुकुंदवाडी अंबिकानगरमधील कैलास हानवते यांच्या उघड्या घरातून ३९ हजारांच्या मोबाईलची चोरी झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद