शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी मागितली औरंगाबादकरांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 19:58 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कचरा प्रश्नी औरंगाबादकरांची माफी मागितली आहे.

औरंगाबाद -  शहरातील ६३ दिवसांपासून झालेली कचराकोंडी येत्या आठ दिवसांत फुटेल. परंतु महापालिकेला कचरा कोंडी फोडण्यात अपयश आले आहे. औरंगाबादकरांनी शिवसेनेवर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी जाहीर माफी मागितली. ते सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर असून ते संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेत आहेत. ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या बैठकीपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले, खा.चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि मनपा अधिकाऱ्यांचीबैठक  घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, कचऱ्याची समस्या बिकट झाली असून त्याला गती नाही. औरंगाबादवासियांची दिलगिरी मागतो. हे काम शासन, प्रशासनाचे आहे. औरंगाबादकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे, त्यामुळे त्यांची क्षमा मागतो. आज जी चर्चा झाली आहे, त्यानुसार मनपा अधिकाऱ्यांनी ८ ते १० दिवसांत कचराकोंडी सुटेल, असे आश्वासन दिले आहे. या विषयात राजकारण आणू इच्छित नाही. शहराला मनपा आयुक्त नाही. पोलीस आयुक्त प्रभारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली. या सगळ्या बाबींमध्ये मार्ग काढणे सुरू आहे. नागरिकांंना त्रास होतो आहे, नागरिकांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. शहराची कचराकोंडी लवकरच फुटेल. कचरा टाकण्यासाठी जेथे पालिका गेली तेथे विरोध झाला. सर्वांनी सहकार्य करावे. कचरा कोंडी सोडविण्यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरले .आहे काय? यावर ठाकरे म्हणाले, नाही नेतृत्व अपयशी ठरले नाही. परंतु सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे, यंत्रणा काम करीत असतांना शासनाकडून मनपा आयुक्त नाही. पूर्ण वेळ पोलीस आयुक्त नाहीत. जिल्हाधिकारी रुजू झालेले नाहीत. मग काम कसे करणार. परंतु ६२ दिवसांत कचरामुक्ती का झाली नाही. यावर ठाकरे म्हणाले, जनता सध्या कचरामुक्ती मागते आहे. सरकारने देखील इतरत्र जागा उपब्ध करून दिली पाहिजे. यंत्रणा, मशिनरी उपलब्ध करून  देण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. भाजपने कोंडी केली आहे काय, यावर राजकारण करू इच्छित नसल्याचे ठाकरे म्हणाले. सरकार आणि प्रशासनाने एकत्रित काम करावे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद