शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीच्या आत्महत्येप्रकरणी दोन तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:07 IST

गारखेडा परिसरातील चुलत्याच्या घरी आलेल्या १५ वर्षीय पूनम अर्जुन वाघाळे हिच्या आत्महत्येप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी तरुणाने सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ टाकून बदनामी करण्याची धमकी फोनवरून दिल्यानेच पूनमने आत्महत्या केल्याचे समोर आले.

ठळक मुद्दे२४ मे रोजी चुलत्याच्या घरी केली आत्महत्या : गावातील तरुणाने सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे टाकून बदनामी करण्याची दिली होती धमकी

औरंगाबाद : गारखेडा परिसरातील चुलत्याच्या घरी आलेल्या १५ वर्षीय पूनम अर्जुन वाघाळे हिच्या आत्महत्येप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी तरुणाने सोशल मीडियावर अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ टाकून बदनामी करण्याची धमकी फोनवरून दिल्यानेच पूनमने आत्महत्या केल्याचे समोर आले.सोनू शिवाजी रगडे (रा. झरी, ता. जिंतूर, जि. परभणी) आणि अक्षय आश्रुबा साळवे (रा.रोहेगाव, ता. सेलू, जि.परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, पूनम वाघाळे (रा.रोहेगाव, ता. सेलू, जि.परभणी) हिने दहावीची परीक्षा दिली होती. गावातील अक्षय साळवे हा त्रास देतो आणि पूनमचा मावसभाऊ सोनू हा अक्षयला मदत करतो म्हणून तिच्या वडिलांनी पूनमला औरंगाबादेतील भारतनगरात राहणारे तिचे चुलते राजेश वाघाळे यांच्याकडे १८ मे रोजी पाठविले होते. त्यानंतर २३ मे रोजी पूनमच्या वडिलांनी सोनू रगडे याला घरी बोलावून त्याला जाब विचारला होता. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांनी राजेश यांच्या फोनवरून त्यांनी पूनमला याबाबत विचारणा केली असता तिने अक्षय आणि सोनू हे त्रास देत असल्याचे त्यांना सांगितले. पूनमच्या वडिलासमोर सोनूने पूनमला फोन करून त्यांच्या त्रासाबाबत कोणालाही काहीही सांगू नको, अन्यथा त्याच्याकडील तिघांची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर टाकून बदनामी करीन अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या पूनमने त्याच रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पूनमचे वडील अर्जुन यांनी सोमवारी अक्षय आणि सोनू यांच्या त्रासाला कंटाळून पूनमने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कापसे तपास करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी