शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

हडकोत पंधरा मिनिटांत पळवले दोन महिलांचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:16 IST

हडको एन-११ येथील रवीनगर आणि सुदर्शननगर येथे अंगण झाडणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मिनीगंठण चोरट्यांनी हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी घडली.

औरंगाबाद : हडको एन-११ येथील रवीनगर आणि सुदर्शननगर येथे अंगण झाडणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन मिनीगंठण चोरट्यांनी हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी पावणेसहा ते सहा वाजेदरम्यान घडली. याविषयी सिडको ठाण्यात चोरट्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

जानेवारीपासून शहरात मंगळसूत्र चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. हडको एन-११ मधील रवीनगर येथील रहिवासी लक्ष्मी धनाजी बोराडे (६५) या शुक्रवारी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास अंगण झाडत होत्या.

यावेळी त्यांच्या मागून गल्लीतून आलेल्या तरुणाने अचानक त्यांच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र आणि सोन्याचे गंठण हिसका देऊन तोडून घेतले. चोरट्याने अडीच तोळ्याचे मिनीगंठण आणि तीन ग्रॅमचे मंगळसूत्र यात सोन्याचे १०० मनी होते. यावेळी लक्ष्मी यांनी आरडाओरड करून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोर तेथून पळून गेल्याने तो लक्ष्मी यांच्या हाती लागला नाही.

या घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनिटांनी सुदर्शननगर येथील संजीवनी सुनील इधारे (२५) यांच्या गळ्यातील मिनीगंठण याच चोरट्याने हिसकावून नेले. संजीवनी या सकाळी ६ वाजेच्या सुमारास अंगण झाडत होत्या.

चोरट्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण हिसका देऊन तोडून घेत पळून गेला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. याविषयी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

घटना दोन, चोरटा एकसंजीवनी आणि लक्ष्मी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याच्या दोन घटनांमधील चोरटा हा एकच असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही महिलांनी दिलेल्या वर्णनानुसार मंगळसूत्र चोरट्याचे वय अंदाजे २० ते २२ वर्षे आहे. त्याची उंची साडेपाच फूट, रंग सावळा, अंगावर काळ्या बाह्याचा गुलाबी टी शर्ट त्याने घातलेला होता.चोरटा सीसीटीव्ही कॅ मे-यात कैदसंजीवनी आणि लक्ष्मी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणारा चोरटा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला. शिवाय त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे काही महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याचे समोर आले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी