शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीप व ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन महिला ठार; अहमदनगर रोडवर अपघाताची मालिका सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:38 IST

जिकठाण येथे आरोग्य केंद्राची जीप व खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन महिला ठार झाल्या तर ९ महिला गंभीर जखमी आहेत.  

औरंगाबाद : जिकठाण येथे आरोग्य केंद्राची जीप व खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन महिला ठार झाल्या तर ९ महिला गंभीर जखमी आहेत.  आज पहाटे ४.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातात जानकाबाई जनार्धन पवार  (६०, रा. दिघी ता. गंगापुर ) व ताराबाई ज्ञानेश्वर बहाद्दुरे (५०, रा.लहान्याचीवाडी ता .फुलंब्री ) या मृत झाल्या.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी (दि.२४ )भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महीलांचे लेप्रोस्कोपी कुंटुबकल्याण आॅपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज पहाटे जिकठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय वाहन ( एमएच २० -  डब्यु - ९५७३) हे शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना घरी सोडण्यासाठी निघाले. भेंडाळा येथुन जिकठाण गावाकडे येत असताना पुणे येथुन औरंगाबादकडे भरधाव जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सने (एमएच ०९  - बीसी -९५४०) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही वाहने दूर फेकली गेली. यात जीपमधील महिला गंभीर जखमी झाल्या. यात जानकाबाई जनार्धन पवार  (६०, रा. दिघी ता. गंगापुर ) व ताराबाई ज्ञानेश्वर बहाद्दुरे (५०, रा.लहान्याचीवाडी ता .फुलंब्री ) या उपचारा दरम्यान मृत झाल्या.

या घटनेची माहिती मिळताच जिकठाणचे सरपंच उमर पटेल, कैलास खोमणे, डॉ. उज्वल चव्हाण, वाळुज पोलीस ठाण्याचे सहायक फोजदार दत्तात्रय साठे भाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी शासकीय वाहन चालक रविंद्र गोरे यांच्या फिर्यादिवरुन खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पळणाऱ्या चालकाला तत्काळ अटक केली. 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूgovernment schemeसरकारी योजनाState Governmentराज्य सरकार