शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:37 IST

भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंढरपूरातील महावीर चौकात घडली.

वाळूज महानगर : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंढरपूरातील महावीर चौकात घडली. सय्यद समीर सय्यद हमीद (१८ रा.गोलवाडी) असे मृताचे नाव असून, घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.

सय्यद समीर सय्यद हमीद हा पंढरपूरातील एका दुचाकी शोरुममध्ये दोन महिन्यापासून शिकाऊ कामगार म्हणून काम करीत होता. शोरुम रविवारी बंद झाल्यानंतर सय्यद समीर हा स्कुटी (एम.एच.२०, ए.एच.२६३२) वर स्वार होऊन पंढरपुरातून दुपारी ४ वाजता गोलवाडी येथे घराकडे जात होता. महावीर चौकात पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक (एम.एच.२०-ए.टी.४८१७) चालकाने सय्यद समीर याच्या स्कुटीला जोराची धडक दिली.

समीर गंभीर जखमी झाला. इतर वाहनधारक व नागरिकांनी रस्त्यावर पडलेल्या सय्यद समीर यास्ला शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी सय्यद इम्रान यांच्या तक्रारीवरुन ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पार्टटाईम काम करुन घेत होता शिक्षणमयत सय्यद समीर याच्या घरची परिस्थती अत्यंत हलाखीची असून त्याचे वडील रिक्षा चालवुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सय्यद समीर हा शहरातील एस.बी.महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. कुटुंबाची ओढाताण होत असल्यामुळे सय्यद समीर हा दोन महिन्यापासून पंढरपूरातील एका दुचाकी शोरुममध्ये शिकाऊ कामगार म्हणून काम करीत होता.

टॅग्स :AccidentअपघातWalujवाळूज